Weather alert : राज्यातील या जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट
मुंबई | पुणे: हवामान विभागाने (weather alert) राज्यातील दहा जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा (Heat Wave) यलो अलर्ट दिला आहे. राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरातसह महाराष्ट्रात 28 ते 31 मार्च या कालावधीत हवेच्या उष्ण लहरी सक्रिय होत आहेत. त्यामुळे कमाल तापमान सरासरी 40 ते 41 अंशांवर जाण्याची शक्यता आहे.
या जिल्ह्यांना उष्ण लाटांचा यलो अलर्ट
जळगाव (29 ते 31 मार्च), नगर (29 ते 31 मार्च), जालना (29 ते 31 मार्च), परभणी (29 ते 31 मार्च), हिंगोली (29 ते 31 मार्च) अकोला (28 ते 30 मार्च), अमरावती (28 ते 30 मार्च) वाशिम (28 ते 30 मार्च), यवतमाळ (28 ते 30 मार्च).
Web Title: weather alert Yellow alert for heat wave in this district of the state