Home महाराष्ट्र Weather Alert : पावसाची शक्यता, उद्यापासून  या जिल्ह्यांना येलो अलर्ट  जारी: हवामान...

Weather Alert : पावसाची शक्यता, उद्यापासून  या जिल्ह्यांना येलो अलर्ट  जारी: हवामान विभाग

Weather Alert Rain Breaking 

मुंबई | Weather Alert Rain : राज्यामध्ये पावसाकरिता पोषक हवामान निर्माण झाले आहे. उद्यापासून राज्यात अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता  हवामान विभागाकडून वर्तवण्यात आले आहे. पुढील ४ दिवस राज्यामध्ये पावसाचा जोर कायम राहणार आहे. अनेक जिल्ह्यांना हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे.

उद्या धुळे आणि नंदुरबार या दोन  जिल्ह्यामध्ये ढगाळ हवामानाची स्थिती राहणार आहे. पुढील २४ तासामध्ये या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे.  ८ जानेवारीनंतर राज्यामध्ये हळुहळू पावसाचा जोर वाढणार आहे. उद्यापासून नंदुरबार, धुळे, नाशिक, जळगाव आणि अहमदनगर या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. यानंतर ८ आणि ९ जानेवारीला मात्र उत्तर महाराष्ट्र, उत्तर कोकण, मराठवाडा आणि विदर्भामध्ये अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पाऊस कोसळणार आहे.

पुढील पाच जिल्ह्यांना उद्यापासून यलो अलर्ट बुलडाणा, वर्धा, अकोला, नागपूर आणि अमरावती

तसेच  ठाणे, पालघरसह उत्तर महाराष्ट्रासह मराठवाड्यामध्ये देखील अनेक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळणार आहेत.

तर रविवारी हवामान विभागाने वाशिम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या ९ जिल्ह्यांना येलो अलर्ट दिला आहे. या जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली जात आहे.

Web Title: Weather Alert Rain Breaking 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here