Home अहमदनगर Weather alert: नगर जिल्ह्यात पुढील चार दिवस पाउस पडणार असल्याचा इशारा

Weather alert: नगर जिल्ह्यात पुढील चार दिवस पाउस पडणार असल्याचा इशारा

Weather alert next four days rain in state 

अहमदनगर | Ahmednagar | Weather alert:  नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आणि दुसर्‍या आठवड्यात पावसाने हजेरी लावली होती. आता पुन्हा एकदा पुढील 4 दिवस नगर जिल्ह्यासह राज्यात पाऊस पडणार असल्याचा इशारा भारतीय हवामान खात्यानं दिला आहे. यामुळे शेतकर्‍यांपुढे आणखी एक संकट उभे राहणार आहे.

राज्यात मेघगर्जनेसह जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे. हवामान विभागानं पावसाचा इशारा दिला आहे.

15 ते 18 नोव्हेंबर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्हात वादळी वार्‍यासह पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. बीड, नांदेड, लातूर, उस्मानाबाद परिसरात पुढे दोन दिवस पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त केला आहे. या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

17 नोव्हेंबरच्या आसपास अरबी समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होणार असल्याचं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे 15 ते 18 नोव्हेंबर दरम्यान राज्याच्या अनेक भागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Web Title: Weather alert next four days rain in state 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here