Home अकोले भंडारदरा व आढळातील पाणी पोहोचले ५० टक्के पर्यंत, धबधबे वाहते, पर्यटकांनो काळजी...

भंडारदरा व आढळातील पाणी पोहोचले ५० टक्के पर्यंत, धबधबे वाहते, पर्यटकांनो काळजी घ्या

Breaking News | Bhandardara Dam Rain:  चार दिवसांच्या विश्रांतीनंतर भंडारदरा परिसरात पाऊस सक्रिय झाला आहे.

water in Bhandardara and Vatha reaches up to 50 percent, the waterfalls flow

अकोले:  आषाढी एकादशीनंतर भंडारदरा धरण पाणलोटात मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून, भंडारदरा धरण ४७ टक्के, तर निळवंडेचा पाणीसाठा २० टक्के झाला आहे. भंडारदरा परिसरात पुन्हा पाऊस सुरू झाल्याने धबधबे वाहते झाले आहेत. आढळा धरणाचा पाणीसाठा ४८ टक्के म्हणजे ५०७ दशलक्ष घनफूट झाला आहे. भंडारदरा धरणात गेल्या २४ तासांत २४१ दशलक्ष घनफूट नवीन पाणी आले आहे.

भंडारदरा धरण पाणलोट परिसरात पर्यटकांची गर्दी वाढली आहे. पर्यटकांनी धरण व परिसरातील उथळ वा खोल पाण्यात उतरू नये, सेल्फी घेताना काळजी घ्यावी, असे आवाहन जलसंपदाचे सहायक अभियंता अभिजीत देशमुख यांनी केले आहे.

तीन- चार दिवसांच्या विश्रांतीनंतर धुवाँधार पाऊस सुरू झाल्याने विकेंडला रतनगड, घाटघर, भंडारदरा धरण रिंगरोड परिसरात, तसेच हरिश्चंद्रगड, कोकणकडा, पाचनई, कुमशेत भागात पर्यटकांची रेलचेल वाढली आहे.

भंडारदरा पाणलोटात ४० किलोमीटरचा रिंगरोड आहे. रिंगरोड परिसरात वावडीच्या डोंगरावरून कोसळत थुईथुई नाचणारे चंदेरी प्रपात, कोलटेभेचा गायमुख, वसुंधरा, नेकलेस, न्हानी धबधबा, सांधनदरी जवळील गिरणाई (गिरणा नदी) उलटा आकाशाकडे झेपावणारा धबधबा, गडावरून कोसळणारे धबधबे, पांजरे येथील वैशाली धबधबा असे असंख्य चंदेरी प्रपात धबधबे पर्यटकांना सफरीसाठी खुणावत आहेत.

तालुक्यातील मुळा खोऱ्यातील आंबीत, पिंपळगाव खांड, कोथळे, शिरपुंजे, बलठण, तर प्रवरा खोऱ्यातील वाकी, टिटवी व आढळा भागांतील पाडोशी हे लघु पाटबंधारे प्रकल्प भरून ओसंडून वाहत असून, सांगवी, घोटी-शिळवंडी, बोरी, बेलापूर बदगी, येसरठाव हे तलाव भरणे बाकी आहे.

भंडारदरा धरणाचा पाणीसाठा ५ हजार १२२ दशलक्ष घनफूट म्हणजे ४७ टक्के इतका झाला आहे. निळवंडेत २० टक्के म्हणजे १ हजार ६५९ दशलक्ष घनफूट पाणी साठले आहे.  

Web Title: water in Bhandardara and Vatha reaches up to 50 percent, the waterfalls flow

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here