Nilwande Dam: निळवंडे धरणातून आवर्तन सोडण्यात आले
अकोले | Akole: निळवंडे धरणातून शेतीसाठी आवर्तन सोडण्यात आले असून हे आवर्तन सुमारे २५ दिवस सुरु राहण्याची शक्यता आहे.
निळवंडे धरणातून शनिवारी सायंकाळी शेतीसाठी १ हजार ३०० कुसेकने आवर्तन सोडण्यात आले. हे रब्बी हंगामातील दुसरे आवर्तन आहे.
निळवंडे व भंडारदरा धरणात मुबलक पाणी साठा उपलब्ध आहे. भंडारदरा धरण जवळपास पूर्ण क्षमतेने भरलेले आहे. आवर्तन सोडतेवेळी १० हजार ६५४ दलघफू पाणी साठा होता. तर निळवंडे धरणात ६ हजार ४१५ दलघफू पाणी साठा होता.
हे आवर्तन साधारणपणे २५ दिवस सुरु राहण्याची शक्यता आहे. अंदाजे सुमारे ३ टीएमसी पाणी वापरले जाण्याची शक्यता आहे. या आवर्तनामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी पाण्याचा फायदा होणार आहे.
Web Title: Water cycle was released from the Nilwande dam