परिचारिकेशी प्रेमसंबंधातून चार वर्ष शारीरिक संबंध ठेऊन नंतर केले असे काही…
Breaking News | Jalna Crime: खाजगी रुग्णालयात सोबत काम करणाऱ्या एका परिचारिकेशी प्रेमसंबंधातून शारीरिक संबंध ठेऊन लग्ग्रास नकार देणाऱ्या तरुणाविरुध्द कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
जालना: खाजगी रुग्णालयात सोबत काम करणाऱ्या एका परिचारिकेशी प्रेमसंबंधातून शारीरिक संबंध ठेऊन लग्ग्रास नकार देणाऱ्या तरुणाविरुध्द कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमोल जगन्नाथ तांगडे (रा.वझर सराटे, जालना) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव असून,
पोलिसांनी त्याला अटक केली आहे. याबाबत मिळालेल्या अधिक माहीतीनुसार, जुना जालना भागातील एका खाजगी बाल रुग्णालयात परिचारिका म्हणून काम करत असलेल्या एका २४ वर्षीय तरुणीचे त्याच ठिकाणी कार्यरत असलेल्या अमोल जगन्नाथ तांगडे (रा. वझर सराटे, ता. जालना) याच्यासोबत प्रेमसंबंध जुळले होते. त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून अमोल तांगडे याने त्या तरुणीवर रुग्णालयात, तसेच ती राहत असलेल्या गांधीचमन भागातील खोलीत तसेच स्वतःच्या खोलीवर बोलावून अनेकवेळा शारीरिक संबंध ठेवले. सदर तरुणीने लग्नाचा तगादा लावला असता, तू माझ्या जातीची नाहीस, मागासवर्गीय आहेस, असे म्हणून त्याने तिच्यासोबत लग्नाला नकार दिला. त्यांनतर तो स्वतःचा मोबाईल बंद करून, जालना शहरातून गायब झाला होता. दरम्यान, सदर तरुणीने आपल्या आई-वडीलांसह काल रात्री कदीम जालना पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी संशयित अमोल तांगडे याच्याविरुद्ध बलात्कार आणि अॅट्रॉसीटी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला असून, त्यास अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी करीत आहेत.
Web Title: was followed by four years of sexual intercourse with a nurse
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study