Home अकोले अकोले: मुलीच्या विनयभंगातील फरार आरोपीला अटक न केल्यास आंदोलनचा इशारा

अकोले: मुलीच्या विनयभंगातील फरार आरोपीला अटक न केल्यास आंदोलनचा इशारा

Akole news: भंडारद-याच्या अभयारण्यात काही दिवसांपूर्वी झालेल्या एका अल्पवयीन मुलीच्या विनयभंगातील फरार असलेल्या आरोपीला अटक करण्यासाठी परिसरातील आदिवासी ठाकर समाज एकवटला.

Warning of agitation if absconding accused of molesting girl is not arrested

भंडारदरा: अकोले तालुक्यातील भंडारद-याच्या अभयारण्यात काही दिवसांपूर्वी झालेल्या एका अल्पवयीन मुलीच्या विनयभंगातील फरार असलेल्या आरोपीला अटक करण्यासाठी परिसरातील आदिवासी ठाकर समाज एकवटला असून दसऱ्यापर्यंत आरोपीला अटक झाली नाही, तर दि. २६ ऑक्टोबर रोजी राजूर पोलीस स्टेशनसमोर आंदोलन करण्याचा इशारा आदिवासी ठाकर समाजाने दिला आहे. अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाच्या पाणलोटातील कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्यात झाड पाल्याचे औषध देण्याच्या बहाण्याखाली एका आदिवासी ठाकर समाजाच्या अल्पवयीन मुलीचा एका व्यक्तीकडुन विनयभंग करण्यात आला होता. यासंदर्भात राजुर पोलिस स्टेशनला आरोपीविरोधात दि. ६ आक्टोबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्यातील आरोपी हा अद्याप फरार असुन राजुर पोलिसांकडुन आरोपीला प्रयत्न करुनही अटक करण्यात अपयश आलेले असल्याने आदिवासी ठाकर समाज एकवटला आहे. आरोपीला दसऱ्यापर्यंत अटक न झाल्यास दि. २६ ऑक्टोबर २०२३ रोजी राजुर पोलिस स्टेशनसमोर तिव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा समाजाने दिला आहे.

आंदोलनाविषयीचे एक निवेदन राजुर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रविण दातरे यांना दिले गेले असुन या निवेदनावर घाटघर, शिंगणवाडी, लव्हाळवाडी, उडदावणे व पांजरे येथील नागरीकांच्या सह्या असुन निवेदन देताना ठाकर समाजाचे जेष्ठ नेते मारुती मेंगाळ, देविदास खडके, लक्ष्मण पोकळे, बाळासाहेब फोडसे, लक्ष्मण गांगड, रावजी मधे, सखाराम गांगड, शांताराम गिन्हें, पत्रकार पांडुरंग उघडे, शांताराम उघडे, मिनानाथ उघडे, विलास आगविले, बच्चु गांगड, पांडुरंग सोंगाळ, देविदास पोकळे, गोरख उघडे, अशोक उघडे व चंदर गांगड यांच्यासह नागरीक उपस्थित होते.

Web Title: Warning of agitation if absconding accused of molesting girl is not arrested

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here