Accident: वारकऱ्यांच्या ट्रकला भीषण अपघात, एक ठार चार जखमी
Satara | सातारा: साताऱ्यामध्ये वारकऱ्यांच्या ट्रकला आयशर टेम्पोने धडक दिल्याने भीषण अपघात (Accident) झाला. या अपघातात एका वारकाऱ्याचा मृत्यू झाला आहे. तर चार जण जखमी झाले आहेत. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. पोलीस तपास करीत आहेत.
या अपघातातील सर्व वारकरी सांगली जिल्ह्यातील असून सांगलीहून आळंदीला जाताना हा अपघात झाला आहे. पहाटेच्या सुमारास साताऱ्यातील रायगाव गावच्या हद्दीत ट्रक आला असता ट्रकचा टायर अचानक फुटला. यामुळे चालकानं ट्रकचं स्पीड कमी केला पण तितक्यात ट्रकला मागुन आयशर टेम्पोने धडक दिल. खरंतर, तीन दिवसांत साताऱ्याच्या हद्दीत वारकऱ्यांच्या गाडीला झालेला हा दुसरा अपघात आहे.
Web Title: Warakari’s truck had a terrible accident one death