Home संगमनेर संगमनेर तालुक्यात पदवीधरसाठी इतके टक्के मतदान, निकालाची प्रतीक्षा

संगमनेर तालुक्यात पदवीधरसाठी इतके टक्के मतदान, निकालाची प्रतीक्षा

Nashik Graduate Constituency Election: Satyajeet Tambe: २ फेब्रुवारीच्या निकालाची प्रतिक्षा, अपक्ष सत्यजित तांबे आणि महाविकास आघाडीच्या शुभांगी पाटील यांच्यात थेट लढत.

voting percentage for graduate Election in Sangamner taluka

संगमनेर: महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील  यांनी लोणी गावातील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर विद्यालयात पदवीधर मतदानाचा हक्क बजावला. सत्यजित तांबे यांचा विजय निश्चित असून सत्यजित तांबे यांनी भाजपात प्रवेश केला पाहिजे. यासाठी आमचा आग्रह राहणार असल्याचे म्हणत सुधीर तांबेंचे काँग्रेसचे रक्त कमी व्हायला अजून थोडा वेळ लागेल अस मिश्कील वक्तव्य सुद्धा विखे पाटलांनी केलं आहे.

आज नाशिक पदवीधर मतदारसंघात निवडणूक मतदान प्रक्रिया पार पडत असून यावेळी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधत मोठं वक्तव्य केलं आहे. ते यावेळी म्हणाले, सत्यजित तांबे यांचा विजय निश्चित असून अन्य उमेदवारांची चर्चा करण्याची आवश्यकता नाही.

 पदवीधर व शिक्षक मतदारसंघासाठी आज मतदान पार पडले असून पाच मतदारसंघातील निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागले आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघात शुभांगी पाटील आणि सत्यजित तांबे यांच्यामध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. तांत्रिक अडचणीमुळे काँग्रेस पक्षाची अधिकृत उमेदवारी करता न आल्याने सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला मात्र त्यानंतर अनेक नाट्यमय घडामोडी घडल्यानंतर अखेरच्या क्षणी भाजप (विखे) ने पाठिंबा देत आपली यंत्रणा सत्यजित तांबे यांच्या विजयासाठी कामाला लावली. त्यामुळे ही निवडून अनेक अर्थाने रंगतदार व रंजक ठरणार आहे. दरम्यान नाशिक पदवीधर मतदार संघाच्या या निवडणूकीला आज सकाळी आठ वाजल्यापासून प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात झाली. मात्र संपूर्ण तालुक्यात पसरलेल्या दाट धुक्याचा परिणामामुळे सुरूवातील संथ गतीने मतदान सुरू झाले. सकाळी दहा वाजेपर्यंत अवघे 9.50 टक्के, दुपारी 12 वाजे पर्यंत 34 टक्के तर दुपारी 4 वाजेपर्यत संगमनेर तालुक्यातील 28 मतदान केंद्रावर 58.72 टक्के मतदान झाले.

 जिल्ह्याच्या नाशिक पदवीधर मतदार संघात एकूण 2 लाख 62 हजार 731 मतदार असून त्यात सर्वाधीक 1 लाख 15 हजार 638 मतदार अहमदनगर जिल्ह्यातील आहेत. पदवीधर मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी निवडणूक आयोगाने या मतदारसंघात 338 मतदान केंद्र उभारली. यात सर्वाधिक मतदार असलेल्या संगमनेर तालुक्यात 28 मतदान केंद्र भारण्यात आली. दुपारी मतदान संपतांना 4 वाजेपर्यंत तालुक्यातील एकूण 28 मतदान केंद्रातील 29 हजार 115 मतदारांपैकी 17095 मतदारांनी (58.72 टक्के) मतदानाचा हक्क बजावला आहे. यात र्वाधिक मतदान धांदरफळ बुद्रूक (79.6 टक्के) तर सर्वात कमी मतदान जि. प. शाळा शिब्लापूर (41.45 टक्के ) 219 मतदान केंद्रावर झाले.

दरम्यान २ फेब्रुवारीच्या निकालाची प्रतिक्षा लागून राहिली आहे. अपक्ष सत्यजित तांबे आणि महाविकास आघाडीच्या शुभांगी पाटील यांच्यात थेट लढत पाहायला मिळाली. संगमनेर तालुक्यात अपक्ष सत्यजित तांबे यांचे पारडे जड राहिले असून त्याचा विजय निश्चित असल्याचा दावा केला जात आहे.

Web Title: voting percentage for graduate Election in Sangamner taluka

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here