संतापजनक! गतिमंद मुलीवर अत्याचार, गर्भवती राहिल्याने प्रकार उघडकीस
Dhule Crime: गतिमंद मुलीचा कोणीतरी गैरफायदा घेऊन तिच्यावर वेळोवेळी अत्याचार (abused) केल्याची घटना.
धुळे : गतिमंद मुलीचा कोणीतरी गैरफायदा घेऊन तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केला. यातून ती गर्भवती राहिल्याने हा प्रकार चव्हाट्यावर आला. हे कृत्य नेमके कोणी केले हे समजू शकले नसल्याने अज्ञात व्यक्तीविरोधात पिंपळनेर पोलिसात गुन्हा दाखल झाला. साक्री तालुक्यातील एका गावात ३५ वर्षांची गतिमंद मुलगी आहे. कोणीतरी तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केला.
ही घटना साधारण दोन महिन्यांपूर्वी घडली आहे. तिला रुग्णालयात दाखल केले असता तिला दोन महिन्यांचा गर्भ असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. याप्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी गुरुवारी रात्री ८ वाजता पिंपळनेर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली.
Web Title: Violent girl abused, exposed due to pregnancy
See also: Latest Marathi News, Ahmednagar News, Education Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App