Accident: शिवसंग्राम नेते विनायक मेटे यांचे अपघाती निधन
Vinayak Mete Accident: आज पहाटे मुंबई पुणे एक्स्प्रेसवर भातान बोगद्याजवळ अपघात.
मुंबई: आज पहाटे शिवसंग्राम नेते विनायक मेटे यांच्या गाडीला अपघात झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेसवर हा अपघात झाला असून पहाटे 5:30 वाजता भातान बोगद्याजवळ ही घटना घडली. ते ५२ वर्षाचे होते. मेटे यांच्या गाडीने अनोळखी वाहनाला धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, गाडीचा पुढील भाग चक्काचूर झाला आहे. तसेच अपघात झाला तेव्हा विनायक मेटे यांचा मुलगा गाडी चालवत असल्याचंही सांगितलं जातंय.
अपघातात त्यांच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली होती. अपघातानंतर जवळपास एक तासभर मेटे यांना कुठलीही मदत मिळाली नव्हती. यानंतर मेटे यांना नवी मुंबईतील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. दरम्यान उपचारादरम्यान मेटे यांचं निधन झालं असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनानं दिली आहे. विनायक मेटे यांचा मुलगा देखील यावेळी त्यांच्यासोबत गाडीत असल्याने त्यालाही किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे.
Web Title: Vinayak Mete Accident death