जिल्ह्यातील या शाळेला ग्रामस्थांनी ठोकले टाळे, ग्रामस्थांचा संताप
Ahmednagar News Live | Karjat | कर्जत: कर्जत तालुक्यातील खेड जवळ अंबेराई जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला टाळे (Lock) लावण्यात आले आहे. या शाळेत चौथीपर्यंतचे वर्ग आहेत त्या शाळेत एकूण २८ विद्यार्थी आहेत. त्यासाठी दोन शिक्षक अपेक्षित आहेत.
मात्र एका शिक्षकाची बदली करण्यात आली आहे. तात्पुरत्या स्वरूपात बदली केलेल्या आदेशात २४ विद्यार्थी संख्या दाखविण्यात आले आहे.
एकाच शिक्षकावर अध्यापनाचा भार येत असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने युक्रांद व ग्रामस्थांच्या वतीने शुक्रवारी शाळेला कुलूप लावण्यात आले आहे.
जोपर्यंत शाळेत दुसरा शिक्षक हजर होत नाही तोपर्यंत शाळा बंद ठेवण्यात येणार येणार असल्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. एकच शिक्षक असल्याने त्यांच्यावर कामाचा ताण येतो. त्यामुळे दर्जेदार शिक्षणापासून वंचित राहतात. म्हणून ग्रामस्थांनी दोन शिक्षकांची मागणी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत टाळे बंद राहणार असल्याची भूमिका घेतली आहे. याबाबत १० जानेवारीला गटविकास अधिकारी यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
उपस्तीत युक्रांदचे कमलाकर शेटे, विलास नलगे, प्रवीण साळुंके, विलास दातीर, विजय पावणे, संदीप मोरे, पोपट दातीर, सचिन नलगे, मोहन शेटे, दिपक मोरे, सर्जेराव शेटे, रवींद्र शेटे, सुनील मासाळ, सचिन मोरे, अमित नलगे यांनी शाळेला टाळे ठोकले.
Web Title: villagers avoided hitting this school closed in Ahmednagar