Home क्राईम संगमनेर तालुक्यातील या गावात सरपंचाची ग्रामस्थाला मारहाण

संगमनेर तालुक्यातील या गावात सरपंचाची ग्रामस्थाला मारहाण

Sangamner Crime News:  सरपंचाची ग्रामस्थाला मारहाण व धमकी.

village in Sangamner taluk, the sarpanch beat up the villager

संगमनेर: संगमनेर तालुक्यातील वडगांवपान या राजकीय दृष्ट्या महत्वाच्या असणाऱ्या गावात गेल्या काही दिवसांपासून ग्रामपंचायत सदस्यांच्या अंतर्गत वादामुळे वडगांवपान चांगलेच चर्चेत आले आहे. दोन दिवसांपूर्वी ग्रामपंचायत सरपंचावर अविश्वास ठराव आणला होता. याच वादातून रविवारी सरपंच श्रीनाथ कोंडाजी थोरात यांनी गावातील ग्रामस्थ रमेश यादव थोरात यांना मारहाण केली. या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात सरपंचाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वडगांवपान ग्रामपंचायत सरपंच श्रीनाथ कोंडाजी थोरात हे विकास कामात सदस्यांना विश्वासात घेत नाही, आर्थिक वर्षाचा हिशोब सादर केला नाही, ग्रामसभा व मासिक सभा वेळेवर घेत नाही, मनमानी पद्धतीने कारभार करतात, चुकीचे ठराव आहे. पास करण्याचा अग्रह करतात त्यामुळे यांच्यावर सदस्यांनी अविश्वास ठराव आणला होता. दरम्यान रविवारी सकाळी ग्रामपंचायत कार्यालयासमोर याबाबत राजकीय वादंग सुरू असतांना व त्याठिकाणी मोठी गर्दी झालेली असतांना फिर्यादी रमेश यादव थोरात हे काय झाले म्हणून पाहण्यासाठी गेले असतांना सरपंच श्रीनाथ थोरात यांनी रमेश थोरात यांना शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. तसेच हाताने मारहाण केली. तसेच जर पुन्हा येथे आलास तर तु व तुझ्या कुटूंबाला संपवून टाकेल अशी धमकी दिली.

याप्रकरणी रमेश थोरात यांनी तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून सरपंच श्रीनाथ थोरात यांच्याविरूद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा रजि नं. ९७४ / २०२३ भादंवि कलम ३२३, ५०४, ५०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

Web Title: village in Sangamner taluk, the sarpanch beat up the villager

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here