Home अकोले विखे पाटील म्हणाले, बाळासाहेब थोरातांच “ते” स्वप्न आम्ही….

विखे पाटील म्हणाले, बाळासाहेब थोरातांच “ते” स्वप्न आम्ही….

Assembly Election | Balasaheb Thorat Vs Radhakrishna Vikhe Patil: मला दिलेल्या संधीच सोनं करत मी चांगलं काम करून दाखवलंय. त्यामुळे जो विश्वास माझ्यावर आधी दाखवला गेलाय तो विश्वास पुन्हा पक्षनेतृत्व व्यक्त करील.

Assembly Election Vikhe Patil said, We are that dream of Balasaheb Thorat

अहमदनगर : विधानसभेत यश मिळाल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील आपल्या मतदारसंघात सक्रीय झाले आहेत. ग्रामदैवत म्हसोबा महाराजांच्या यात्रेच्या नियोजनासाठी त्यांनी ग्रामस्थांसोबत बैठक घेतली.

यावेळी त्यांनी पत्रकारांना अनेक विषयांवर प्रतिक्रीया दिल्या. ते म्हणाले कि, “माझ्यामागे ग्रामदैवत म्हसोबा महाराजांचा नेहमीच आशिर्वाद राहिलाय. त्याचबरोबर पंतप्रधान मोदी आणि अमित शहांचा देखील आशिर्वाद माझ्या पाठीशी आहे. त्यांनी मला दिलेल्या संधीच सोनं करत मी चांगलं काम करून दाखवलंय. त्यामुळे जो विश्वास माझ्यावर आधी दाखवला गेलाय तो विश्वास पुन्हा पक्षनेतृत्व व्यक्त करील अशी मला खात्री आहे.”

श्रीरामपुर मध्ये महायुतीच्या आपआपसातील मतभेदामुळे ती जागा गेली. ती जाण्याचं खरतर कारण नव्हतं. दुर्दैवाने राम शिंदे यांचा देखील फार कमी फरकाने पराभव झाला. तेथे काही स्थानिक परिस्थिती उद्भवली असेल. नाहीतर जिल्हा हा 12 – O केला असता. बाळासाहेब थोरातांच जे स्वप्न होतं कि जिल्हा 12 – 0 झाला पाहिजे ते आम्ही निश्चितच पुर्ण केल असतं, असा टोला विखे पाटलांनी थोरातांना लगावला.

Web Title: Assembly Election Vikhe Patil said, We are that dream of Balasaheb Thorat

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here