वंचितकडून संगमनेर, राहुरीत, शेवगाव उमेदवार जाहीर
Breaking News | Ahmednagar Loksabha Election: विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडी पक्षाकडून उमेदवारांची तिसरी यादी जाहीर.
संगमनेर : विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडी पक्षाकडून उमेदवारांची तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे.
यात संगमनेर विधानसभा मतदारसंघातून पक्षाचे संगमनेर शहराध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते अझीझ अब्दुल व्होरा, तर राहुरीमधून अनिल भिकाजी जाधव यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. याआधी प्रा. किसन चव्हाण यांची शेवगाव- पाथर्डी मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे.
पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबडेकर यांनी व्होरा, जाधव यांच्या नावावर. शिक्कामोर्तब केले आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत संगमनेर मतदारसंघातून महायुती, महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार रिंगणात असतील.
Web Title: Vidhansabha Election Sangamner, Rahurit, Shevgaon candidates announced from Vanchit
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study