तरुणीला अल्कोहोल मिश्रित द्रव्य पाजून अत्याचार करताना व्हिडिओ आणि फोटो काढले, व्हायरल करण्याची धमकी देत ३ वर्ष अत्याचार
Rape Case | कळवा: आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीवर वारंवार तीन वर्ष अत्याचार (Rape) करणाऱ्या नराधम आरोपीस कल्याण पोलिसांनी अटक केली आहे. गणेश उर्फ जितु अशोक सुरवसे (वय ३३) असे आरोपीचे नाव आहे. आरोपीने पीडित तरुणीला आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यानंतर तिच्यावर तीन वर्ष अत्याचार केला. एवढंच नाही तर, जेव्हा या तरुणीचं लग्न ठरलं, तेव्हा तिच्याच नावे एक सोशल मीडियावर बनावट अकाऊंट उघडून इतरांसोबत चॅटिंग सुरू केली. त्यानंतर पीडित तरुणीला अनोळखी व्यक्तीचे कॉल आणि मॅसेज येऊ लागले. या सर्व प्रकाराला कंटाळून पीडित मुलीने पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, काही आरोपी गणेश याने पीडित तरुणीला आपल्या वाढदिवसानिमित्त दिवा येथील घरी बोलावलं. त्यानंतर तिला शीतपेय असल्याचं सांगत अल्कोहोल मिश्रित द्रव्य पाजून पीडिता नशेत असल्याचा फायदा घेत आरोपीने तिच्यावर अत्याचार केला. इतकंच नाही तर, आरोपीने पीडित तरुणीसोबत अत्याचार करताना व्हिडिओ आणि फोटोही काढले. जेव्हा तरुणीला जाग आली तेव्हा आपल्यावर अत्याचार झाल्याचे तिला कळाले. त्यानंतर घडलेल्या प्रकारावर संताप व्यक्त करत पीडिता आपल्या घरी निघून गेली.
दरम्यान काही दिवसांनी आरोपीने पीडित तरुणीला तिच्यासोबत अतिप्रसंग करतानाचे व्हिडिओ आणि फोटो (Video and Photos of abusing) पाठविले आणि व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल (Viral) करण्याची धमकी दिली. पुढे याच व्हिडिओचा फायदा घेत आरोपीने २०१९ ते २०२२ या तीन वर्षाच्या कालावधीत पीडित तरुणीवर वारंवार बलात्कार केला. तिच्यावर वेळोवेळी जबरदस्ती शारीरिक संबंध प्रस्थापित केले. इतकंच नाही तर,जानेवारी २०२२ मध्ये फिर्यादी तरुणीचे लग्न ठरले होते. याची माहिती या नराधमाला मिळाल्यानंतर त्याने पीडित तरुणीच्या नावाने सोशल मिडीयावर बनावट खाते तयार केले. त्या अकाऊंटवर फोटो आणि व्हिडिओ टाकत पीडितेची बदनामी सुरू केली. इतक्यावर हा नराधम थांबला नाही. तर, त्याने पीडितेच्या नावावर इतरांना अश्लिल मॅसेज केले. त्यानंतर पीडितेला अनोळखी व्यक्तीचे कॉल आणि मॅसेज येऊ लागले. या सर्व प्रकाराला कंटाळून अखेर पीडितेने नराधमाच्या विरोधात कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा करण्यात आला.
Web Title: Videos and photos taken while torturing, threatening to go viral, Rape for 3 years