Home अहिल्यानगर अहिल्यानगर:  अल्पवयीन मुलीचे व्हिडिओ इंस्टाग्रामवर टाकले

अहिल्यानगर:  अल्पवयीन मुलीचे व्हिडिओ इंस्टाग्रामवर टाकले

Breaking News | Ahilyanagar Crime: अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिचा हात पकडून विनयभंग केला. तसेच मुलीचे फोटो असलेले व्हिडिओ इंस्टाग्रामवर टाकले.

Video of minor girl posted on Instagram

अहिल्यानगर:  अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिचा हात पकडून विनयभंग केला. तसेच मुलीचे फोटो असलेले व्हिडिओ इंस्टाग्रामवर टाकले. अविनाश गोरख ठोकळ (रा. उल्हासनगर, ता. कल्याण, जि.ठाणे) असे आरोपी युवकाचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना 15 जून 2023 ते जानेवारी 2025 व फेब्रुवारी 2025 दरम्यान केडगाव येथे घडली. याप्रकरणी 14 मार्च रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अल्पवयीन मुलीच्या आईने कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांची मुलगी ही शाळेत जात असताना आरोपी ठोकळ याने तिचा पाठलाग केला, तसेच विनयभंग करत इंस्टाग्रामवर मुलीचे फोटो असलेले व्हिडिओ टाकले. उपाधीक्षक अमोल भारती, निरीक्षक प्रताप दराडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक कुणाल सपकाळे यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कुणाल सपकाळे हे करीत आहेत.

Web Title: Video of minor girl posted on Instagram

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here