प्रेयसीला व्हिडिओ कॉल करत प्रियकराने घेतले पेटवून
Mumbai: १९ वर्षीय तरुणाने प्रेयसीला व्हिडिओ कॉल करत स्वतःला पेटवून (Fire) घेतले.
मुंबई : उपनगरातील सांताक्रूझ येथे एका १९ वर्षीय तरुणाने प्रेयसीला व्हिडिओ कॉल करत स्वतःला पेटवून घेतले. मंगळवारी हा प्रकार उघड झाला असून वाकोला पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत.
भाजलेल्या तरुणाचे नाव सागर परशुराम जाधव असे असून तो ३० टक्के भाजला आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वाकोला पोलीस ठाण्यातील एका अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, सोमवारी रात्री उशिरा एका गणपतीच्या मंडळाला भेट दिल्यानंतर सागरचे त्याच्या मैत्रिणीशी फोनवर वाद झाले.
त्यानंतर त्याने स्वत:ला पेटवून घेण्याची धमकी दिली. धमकीनुसार कृती केली, तेव्हा त्याच्या शर्टला आग लागली, असे अधिकाऱ्याने सांगितले. सागरच्या कुटुंबातील सदस्यांनी आग विझवण्यासाठी धाव घेतली आणि त्याला रुग्णालयात नेले. सागरच्या जबाबात त्याने म्हटले आहे की, त्याने उचललेल्या टोकाच्या पावलासाठी कोणालाही जबाबदार धरू नये.
Web Title: Video calling girlfriend caught by boyfriend on fire