Home क्राईम महिला ग्राहकांचे नंबर घेऊन व्हिडीओ कॉल, बायकांनी दुकानात घुसून पुष्पराज फोडला

महिला ग्राहकांचे नंबर घेऊन व्हिडीओ कॉल, बायकांनी दुकानात घुसून पुष्पराज फोडला

Video call with Molestation female customer numbers, women broke into the shop 

बदलापूर: बदलापूर शहरात महिलांनी दुकानात घुसून दुकानदाराला मारहाण केल्याची घटना घडली आहे. दुकानदार त्याच्या दुकानात आलेल्या महिलांकडून मोबाईल नंबर घेत असे. त्यानंतर त्यांना व्हिडीओ कॉल (Video Call) करुन त्रास द्यायचा, अशी तक्रार समोर आली होती. दुकानदाराच्या घृणास्पद कृत्यांमुळे संतापलेल्या महिलांनी थेट दुकानात हल्लाबोल करत  दुकानदाराला चांगलाच चोप  दिला. पुष्पराज परिहार असे महिलांचा चोप दिलेल्या  दुकानदाराचं नाव आहे. पोलिसांनी पुष्पराज याच्याविरोधात विनयभंगाचा (Molestation) गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली आहे.

बदलापूरच्या पश्चिम भागातील आशीर्वाद हॉस्पिटल समोर अनामिका नोवेल्टी नावाचं स्टेशनरी दुकान  आहे. या दुकानात आलेल्या महिलांकडून दुकानदार पुष्पराज परिहार हा त्यांचे नंबर काहीतरी घेऊन सेव्ह करून ठेवत असे. त्यानंतर या महिलांना व्हिडिओ कॉल करून पुष्पराज त्रास द्यायचा अशा काही तक्रारी समोर आल्या. त्यामुळे स्थानिक महिलांनी रविवारी संध्याकाळी पुष्पराज याला दुकानात जाऊन  चांगलाच चोप दिला. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी पुष्पराज याच्याविरोधात विनयभंगाचा (Molestation) गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.

Web Title: Video call with Molestation female customer numbers, women broke into the shop 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here