संगमनेर: वाळू वाहतूक करणारी वाहने पकडली, महसूल विभागाची कारवाई
म्हाळुंगी या नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात बेकायदेशीररित्या वाळूचा उपसा, संगमनेर महसूल पथकाची कारवाई ( seized).
संगमनेर; संगमनेर तालुक्याच्या पठार भागातून बेकायदेशीर वाळू उपसाबाबत मोठी बातमी हाती आहे. साकुर नजीक असणाऱ्या मांडवे, शिंदोडी येथील मुळा नदीच्यापात्रातून बेकायदेशीररित्या वाळू वाहतूक करणारा विनानंबरचा टेम्पो आणि ट्रॅक्टर संगमनेर येथील महसूलच्या भरारी पथकाने पकडला आहे. संगमनेर तालुक्यातील मुळा प्रवरा, आढळा, म्हाळुंगी या नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात बेकायदेशीररित्या वाळूचा उपसा सुरू आहे.
या छाप्यात भारत काळणार (रा. चिखलठाण ता. राहुरी) यांचा विना क्रमांकाचा टेम्पो वाळूवाहतूक करताना आढळून आला. तर तुषार धुळगंड (रा. मांडवे) याचा विनाक्रमांकाचा ट्रॅक्टर वाळू उपसा करत असताना मिळून आला. महसूल पथकाने दोन्ही वाहने आणि त्यातील 1 ब्रास वाळू असा 7 लाख रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.
मात्र या वाळू उपशाकडे महसूल विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. पठार भागातील मुळा नदीपात्रातून वाळू उपसा होत असल्याची माहिती संगमनेरचे तहसीलदार अमोल निकम यांना समजली. त्यांनी तत्काळ भरारी पथकातील नायब तहसीलदार उमाकांत कडनोर मंडलाधिकारी इरप्पा काळे, कामगार तलाठी अनिल कुंदेकर, प्रदीप गोरे यांना आपल्यासमवेत घेत मुळा नदीपात्र गाठले आणि छापा टाकला.
Web Title: Vehicles carrying sand were seized
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App