स्पाय कॅमेऱ्याचा वापर अन् स्वतःच्या पत्नीचे नको ते व्हिडीओ शूट
Vaishnavi Hagawane Death Case: स्पाय कॅमेऱ्याच्या साहाय्याने स्वतःच्या पत्नीचे आक्षेपार्ह व्हिडीओ रेकॉर्ड केल्याबद्दल निलेश चव्हाणवर 2019 साली पुण्यातील वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
पुणे: वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेल्या निलेश चव्हाण याचा इतिहास देखील स्वतःच्या पत्नीच्या अमानुष छळाचा राहिला आहे. स्पाय कॅमेऱ्याच्या साहाय्याने स्वतःच्या पत्नीचे आक्षेपार्ह व्हिडीओ रेकॉर्ड केल्याबद्दल निलेश चव्हाणवर 2019 साली पुण्यातील वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता याच पोलीस ठाण्यात वैष्णवीचे बाळ मागण्यासाठी आलेल्या तिच्या माहेरच्या लोकांना पिस्तुलाच्या साहाय्याने धमकावल्याचा गुन्हा निलेश चव्हाणवर दाखल झाला आहे.
तीन जून 2018 ला निलेश चव्हाणच लग्न झालं. जानेवारी 2019 मध्ये निलेश चव्हाणच्या पत्नीला बेडरूममधील सिलिंग फॅनला काहीतरी संशयास्पद अडकवल्याचा संशय आला. तिने निलेशला याबद्दल विचारलं असता त्यानं उडवाउडवीची उत्तरं दिली. पुढच्या फेब्रुवारी महिन्यात निलेशच्या पत्नीला घरातील एअर कंडिशनला काहीतरी संशयास्पद अडकवल्याचा संशय आला. त्यावेळीही निलेशने उडवाउडवीची उत्तर दिली. एक दिवस निलेशच्या बायकोने त्याचा ल्यापटॉप उघडून पहिला असता, त्यामध्ये त्यांच्या शरीर संबंधांचे व्हिडीओ स्पाय कॅमेऱ्याच्या साहाय्याने रेकॉर्ड केल्याचं तिला आढळून आलं. बेडरूममधील लाईट सुरु ठेऊन शरीर संबंध ठेवण्यास भाग पाडत होता. त्या लॅपटॉपमध्ये निलेशच्या बायकोला त्याचे आणखी काही मुलींसोबतचे आक्षेपार्ह्य अवस्थेतील व्हिडीओ देखील आढळून आले.
निलेश चव्हाण यानेही स्वतःच्या पत्नीचा छळ केल्याचे समोर आले आहे. स्पाय कॅमेऱ्यानं आपल्याच पत्नीचे आक्षेपार्ह व्हिडीओ काढल्याचा त्याच्यावर आरोप करण्यात येत आहे. दरम्यान, पत्नीच्या आक्षेपार्ह व्हिडीओ प्रकरणी निलेश चव्हाणवर २०१९ ला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 3 जून 2018 साली निलेश चव्हाणच लग्न झालं. जानेवारी 2019 मध्ये निलेश चव्हाणच्या पत्नीला त्यांच्या बेडरूममधील सिलिंग फॅनला काहीतरी संशयास्पद अडकवल्याचा संशय आला. त्यावेळी तिने निलेशला याबद्दल विचारणा केली असता त्यानं उडवाउडवीची उत्तरं दिली .
निलेश चव्हाण याचे हगवणे कुटुबांसोबत कौटुंबिक संबंध होता. कसपटे कुटुंबीयांनी वैष्णवीच्या बाळाचा ताबा मागितल्यावर तो देण्यास त्याने नकार दिला होता. निलेश चव्हाण हा वैष्णवीची नणंद करिश्मा हगवणेचा मित्र असल्याची माहिती समोर आली आहे. वैष्णवी यांच्या मृत्यूनंतर त्यांचं बाळ हगवणे कुटुंबीयांनी निलेश चव्हणाकडे दिलं होतं तेव्हा निलेश चव्हाणने त्याच्याकडील पिस्तूल कसपटे कुटुंबीयावर रोखली होती. निलेश चव्हाण याच्यावर कसपटे कुटुंबीयाला धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कस्पटे कुटुंबीयांच्या (वैष्णवीच्या माहेरचे) तक्रारीवरुन निलेश चव्हाण याच्या विरोधात पुण्यातील वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कस्पटे कुटुंबीयांना धमकावल्याबद्दल आणि पिस्तुलाच्या सहाय्याने दहशत निर्माण केल्याबद्दल हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 20 मे रोजी वैश्नवीच्या माहेरचे लोक तीच्या नऊ महिन्यांच्या बाळाला घेण्यासाठी कर्वे नगर भागातील निलेश चव्हाणच्या घरी गेले असता निलेश चव्हाणने त्यांना पिस्तुलाचा धाक दाखवून हीसकाऊन लावले होते . कस्पटे कुटुंबीयांनी बाळाचा ताबा मागीतल्यावर तो देण्यास त्याने नकार दिला होता. वैश्नवीचे काका मनोज कस्पटे यांनी निलेश चव्हाण विरोधात वारजे पोलीसांकडे बाळाला बेकायदेशीर डांबून ठेवल्याची तक्रार दीली. मात्र पोलीसांनी धमकावल्याच्या आरोपाखाली निलेश चव्हाण विरोधात गुन्हा दाखल केलाय. निलेश चव्हाण हा वैनवीचा नवरा शशांक आणि वैश्नवीची नणंद करिश्मा हगवणेचा मित्र आहे.
महत्वाचे: नवनवीन फिचर मिळविण्यासाठी आजच आपला अॅप अपडेट करा. येथे क्लिक करा.
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना अटक करण्यात आली आहे. राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे हे गेल्या सात दिवासांपासून फरार होते. आज (23 मे) सकाळी पहाटे 4.30 वाजता राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली.
Breaking News: Using a spy camera and shooting unwanted videos of his own wife