अकोले अवकाळी पावसाचा फटका: घराची भिंत पडल्याने कुटुंब पूर्णतः उघड्यावर
Akole Collapses: खानापूर येथे घराची भिंत पडल्याने खडके कुटुंब पूर्णतः उघड्यावर … माजी उपसभापती मारुती मेंगाळ यांनी घटनास्थळी जाऊन घेतली भेट .घरकुल मिळून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे दिले आश्वासन.
अकोले : अकोले तालुक्यातील सर्वत्र विभागात मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस झाल्याने सर्व सामान्य शेतकऱ्याला या अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे अनेक भागात शेती पिके उध्वस्त झाली आहे तर बहुतेक ठिकाणी जीवित हानी झाली झाल्याने सर्व सामान्य शेतकरी अक्षरशः मेटा कुटीला आला असून दुसरी कडे या अवकाळी पावसाने अकोले तालुक्यातील खानापूर येथिल सौ. संगिता तुकाराम खडके,श्री विष्णु तुकाराम खडके ,श्री पप्पू तुकाराम खडके यांच्या राहत्या घराची भिंत पडल्याने हे खडके कुटुंब पूर्णतः उघड्यावर आले आहे.घटनेची माहिती समजताच माजी उपसभापती मारुती मेंगाळ यांच्या शिष्ट मंडळाने घटनास्थळी जाऊन भेट घेतली प्रशासकीय पातळीवर या कुटुंबाला सर्वतोपरी मदत मिळून देणार असल्याचे या प्रसंगी मेंगाळ यांनी सांगितले आहे .
दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात पुढे म्हटले आहे की गेली अनेक दिवसांपासून अकोले तालुक्यातील सर्वत्र भागात मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस सुरू आहे.भात पिकांसोबत सोयाबीन, टोमॅटो, मका, बाजरी, फसर वाल, कोबी, फ्लावर, ऊस, या सहित मुख्य पिके वाया गेली आहेत दुसरी कडे अनेक ठिकाणी जीवित हानी झाली आहे . लंपी सारख्या आजाराने कहर घातला असून शेतकरी पूर्णतः सगळ्या बाजूने अडचणीत आला असून अकोले तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी सध्या जोर धरीत आहे प्रशासकीय यंत्रणेवर दबाव तंत्र म्हणून त्या साठी अकोले तालुक्यातील सर्वच राजकीय पक्षांच्या नेते मंडळींकडून मोर्चे आंदोलने या माध्यमातून दबाव वाढवण्याचा प्रयत्न होत आहे. अवकाळी पावसामुळे सर्व सामान्य शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असताना याच अवकाळी पावसाचा फटका खडके कुटुंबाला बसला असून आपल्या रहात्या घराची भिंत पहाटे सकाळी 6 च्या.सुमारास पडली घरात 5 माणसे आणि 4ते 5 लहान मुले झोपली होती सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही मात्र घराची भिंत पडल्याने हे कुटुंब पूर्णतः उघड्यावर आल्याने ही माहिती समजता माजी उपसभापती मारुती मेंगाळ यांच्या शिष्ट मंडळाने घटना स्थळी जाऊन भेट घेतली तलाठी /ग्रामपंचायत पातळीवर संबंधित अधिकाऱ्यांसोबत संपर्क साधून सदरील घटनेचा पंचनामा करून घेतला असून अकोले पंचायत समिती स्तरावर या कुटुंबाला शबरी आवाज योजना अथवा पंतप्रधान आवास योजनेचे अंतर्गत घरकुल मिळून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मेंगाळ यांनी आश्वासन दिले तर सामाजिक कार्यकर्ते सुरेश नवले सुरेश साबळे यांच्या माध्यमातून या कुटुंबाला सध्या राहण्यासाठी खानापूर अंगणवाडी येथे व्यवस्था केली आहे दोन्ही कार्यकर्ते खडके कुटुंबाला सहकार्य करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे या प्रसंगी सुरेश पथवे, बाळू मधे, मावांजी अगिवले, नवनाथ मधे, दिपक पथवे, सुरेश साबळे, भरत गिऱ्हे, रमेश खोडके, विष्णु कातोरे, नंदू पवार या सहित आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
Web Title: Unseasonal rains hit Akole Family exposed as house wall collapses