Home अहमदनगर अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार, क्लिप व्हायरल करण्याची धमकी

अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार, क्लिप व्हायरल करण्याची धमकी

Breaking News | Ahmednagar:  एका अल्पवयीन मुलासोबत अनैसर्गिक संबंध ठेवत, त्याची क्लिप व्हायरल करण्याची धमकी देत खंडणीची मागणी केल्याची धक्कादायक घटना.

Unnatural abuse of minor, threat to make clip viral

कोपरगाव: कोपरगाव शहरात एका अल्पवयीन मुलासोबत अनैसर्गिक संबंध ठेवत, त्याची क्लिप व्हायरल करण्याची धमकी देत खंडणीची मागणी केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अजय गणेश पाटील व रुपेश ज्ञानेश्वर गायकवाड यांच्यावर कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, 2019 मध्ये ब्रिजलाल नगर मधील फ्लॅटवर तसेच गेल्या महिन्यात हॉटेल किशोर अँन्ड येथे, मार्च 2024 रोजी ब्रीजलाल नगर जवळील मोकळया जागेतील काटवनात आरोपी अजय याने त्याचा मित्र रुपेश याच्या मदतीने फिर्यादी सोबत वेळोवेळी फिर्यादीच्या मर्जीच्या विरोधात अनैसंगिक संभोग करुन त्याचा व्हिडीओ काढला. तसेच तो व्हिडीओ व्हायरल न करण्याच्या बदल्यात तीन लाख रुपयांची खंडणी मागून फिर्यादीस तसेच त्याच्या आई वडिलांना फोनवर तसेच समक्ष शिवीगाळ केली. पीडित अल्पवयीन मुलाने याबाबत दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी विरोधात कोपरगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये धमकी देणे खंडणी मागणे पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आहे. पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. विश्वास पावरा हे अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Unnatural abuse of minor, threat to make clip viral

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here