Home अकोले अकोले: निळवंडे कालवे विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल

अकोले: निळवंडे कालवे विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल

अकोले: पेट्रोलपंप चालकाच्या बदनामी प्रकरणी निळवंडे कालवे विभागाचे कार्यकारी अभियंता भारत शिंगाडे यांच्यासह अन्य एका विरुद्ध अकोले पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, अकोले तालुक्यातील रुंभोडी येथील श्री गुरुदत्त पेट्रोलियमचे मालक अशोक रावसाहेब सावंत यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हंटले आहे की, दिनांक १४ जुन रोजी सायंकाळी ५:३० च्या सुमारास भारत शिंगाडे व तुकाराम केदार यांनी त्यांचे मोबाईल नंबर अनुक्रमे ९३७३९५५४०० व ९४०४०५०७५३२ या क्रमांकावरून फिर्यादी अशोक सावंत यांचे मोबाईल नंबर ९४२०९४५४५४ या क्रमांकावर फोन केला व फिर्यादीस म्हणाले की, तुम्ही डीजेल मध्ये पाणी मिक्स करता, आम्ही सरकारी माणसे आहोत, त्यावर फिर्यादी हा आरोपी शिंगाडे व केदार यांना म्हणाला की, तुम्ही पंपावर या तुम्हाला चेक करून दाखवतो, तुम्ही खात्री करुन घ्या. त्यावर आरोपी महाराष्ट्र शासन असे लिहिलेल्या त्यांच्या स्विफ्ट गाडीतून पंपावर आले व म्हणाले. आम्ही सरकारी माणसे आहोत. तुम्ही डीजेलमध्ये पाणी टाकून विकता आम्ही तुमची क्लिप काढली आहे. आम्ही हि क्लिप व्हायरल करू असे फिर्यादीचे वडील रावसाहेब सावंत यांना दम दिला. वरील आशयाच्या फिर्यादीवरून कलम ५०६, ५०७ अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल वाघ हे करीत आहे.

आरोपींनी यासंदर्भात तहसील कार्यालय पुरवठा विभागात तोंडी तक्रार केली होती. या तक्रारीवरून पुरवठा निरीक्षक राकेशकुमार रावते यांनी संबंधित पेट्रोल पंपावर पंचासमक्ष जाऊन दि. १६ जुन रोजी तपासणी केली. तसेच पेट्रोल व डीझेलची वाटर तपासणी घेतली असता सदर दोन्ही साठ्यात पाण्याचा अवशेष आढळून आला नाही.

याप्रकरणी कार्यकारी अभियंता भारत शिंगाडे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांचा संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे त्यांचे म्हणणे समजू शकले नाही.     

Website Title: unlawful act against the executive engineer of the Nilwande Canal 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here