Home अकोले Bhandardara Dam: भंडारदरा धरणात अज्ञात पर्यटकाचा बुडून मृत्यू

Bhandardara Dam: भंडारदरा धरणात अज्ञात पर्यटकाचा बुडून मृत्यू

Unidentified tourist drowns in Bhandardara dam

भंडारदरा | Bhandardara Dam: भंडारदरा धरण परिसरात पर्यटनावर बंदी घालण्यात आली आहे तरी लोकांनी नियमांचे उल्लंघन होत असल्याचे दिसून येत आहे. शुक्रवारी धरणातील पाण्यात एका पर्यटकाचा बळी गेला आहे. भंडारदरा धरणाच्या लोखंडी दरवाजाजवळ स्पीलवे जवळ अज्ञात पर्यटकांचे बूट, मोजे व इतर साहित्य बेवारस आढळून आले.

शनिवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास बुडालेल्या अज्ञात तरुण पर्यटकाचा मृतदेह धरणाच्या स्पिलवे गेटजवळ पाण्यावर तरंगताना पोलिसांना आढळून आला.

शुक्रवारी सायंकाळी भंडारदरा धरणात चार वाजेच्या दरम्यान एक पर्यटक बुडाला असल्याची माहिती माहिती मिळाली होती. त्यानुसार राजूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक नितीन खैरनार व पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.  त्यावेळी लोखंडी दरवाजाजवळ स्पीलवे जवळ अज्ञात पर्यटकांचे बूट, मोजे व इतर साहित्य बेवारस आढळून आले.

पोलीस उपनिरीक्षक खैरनार यांनी शेंडी येथून काही निष्णात पोहनार्या लोकांना आणून शोध घेतला. रात्र झाल्याने शनिवारी पुन्हा प्रयत्न केले. त्यांनतर रात्री आठ वाजेच्या सुमारास स्पिलवे गेटजवळ त्या व्यक्तीचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला. तो मृतदेह बाहेर काढण्यात आला. दरम्यान ती तरुण व्यक्ती कोण होती याची माहिती पोलिसांना मिळाली नाही.  

Web Title: Unidentified tourist drowns in Bhandardara dam

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here