संगमनेर खुर्दमध्ये आढळला अज्ञात इसमाचा मृतदेह
संगमनेर खुर्दमध्ये आढळला अज्ञात इसमाचा मृतदेह
संगमनेर: – शहरालगत असणाऱ्या संगमनेर खुर्द, देवगाव फाटा येथे काल रविवारी सकाळी ८.३० च्या सुमारास एका ३७ वर्षीय अज्ञात इसमाचा मृतदेह आढळुन आला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. आज सोमवार ही मृतदेहाची ओळख न पटल्याने हा मृतदेह शवविच्छेदन गृहात ठेवण्यात आला आहे.
You May Also Like: Deepika Padukone Ranveer Singh Marriage Date
या बाबत माहिती अशी की, शहर पोलिस स्टेशन हद्दीतील संगमनेर खुर्द, देवगाव फाटा येथील बाभळीच्या काटवनात एका ३७ वर्षीय अज्ञात इसमाचा मृतदेह पडलेला होता. सकाळी प्रातविधीसाठी गेलेल्या काही नागरीकांना हा मृतदेह आढळुन आला. या बाबत शहर पोलीस स्टेशनाला माहिती मिळताच पो. नि. अभव परमार व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा करीत मृतदेह शवविच्छेदनासाठी कॉटेज रुग्णालयात पाठविण्यात आला. मयताचे अंदाजे वय ३७ वर्षे असुन अंगावर लाल रंगाचा शर्ट, निळया रंगाची पॅन्ट, चॉकलेटी रंगाची अंडरवेअर, असे या मयताचे वर्णन असुन मयताची ओळख अद्याप पटलेली नाही.
दरम्यान मयताच्या अंगावर काही जखमाही अढळुन आल्या मात्र या जखमा मारहाणीच्या आहेत की आणखी कशाच्या आहेत हे शवविच्छेदनानंतर स्पष्ट होणार आहे. तसेच मृतदेहाच्या जवळ एक बाटलीही अढळुन आली असुन मयताने वीष पिवुन आत्महत्या केली की हा घातपात आहे याबाबत शहर पो. नि. अभय परमार यांच्या मार्गदर्शनाखाली पो. नि. धादवड हे करीत आहे.
मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा
आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. रहा अपडेट दररोज. धन्यवाद. मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा.
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा. आपल्याला ही बातमी आवडल्यास फेसबुक वर जरूर शेअर करा धन्यवाद.