ब्रेकिंग: इमारत कोसळून पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू- Accident
Accident: अमरावती शहरात दुकान कोसळल्याने पाच जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
अमरावती: अमरावती शहरातील प्रभाग चौकात एक धक्कादायक घटना घडल्यानं खळबळ उडाली आहे. या चौकात राजदीप बॅग दुकान कोसळल्याने पाच जणांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. ढिगाऱ्याखालून पाच मृतदेह बाहेर काढले आहेत. तर ढिगाऱ्यात अडकलेल्या इतर नागरिकांचा शोध सुरु आहे.
अमरावतीच्या इमारत दुर्घटनेची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून दखल घेण्यात आली आहे. या दुर्घटनेत मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून देण्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून दिली आहे.
अमरावतीच्या इमारत दुर्घटनेची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून दखल घेतली आहे. अमरावतीमधील जुनी इमारत कोसळल्याने पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर २ जण जखमी झाले आहेत. या घटनास्थळी मलबा हटवण्याचे काम सुरू आहे. या दुर्घटनेनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सातत्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत. दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांना उपमुख्यमंत्र्यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.
Web Title: Unfortunate death of five people due to building collapse accident
See Latest Marathi News, Ahmednagar News and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App