Home अहमदनगर अहमदनगर: वर्गाच्या निरोप समारंभाचा आनंद घेताना विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू

अहमदनगर: वर्गाच्या निरोप समारंभाचा आनंद घेताना विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू

Breaking News | Ahmednagar: कृषी तंत्र विद्यालयात कृषी पदविकेचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू. (Death)

Unfortunate death of a student studying Agriculture Diploma in Krishi 

पुणतांबा: महात्मा फुले कृषी विद्यापीठाशी संलग्न असलेल्या पुणतांबा येथील कृषी तंत्र विद्यालयात कृषी पदविकेचे शिक्षण घेणाऱ्या सुयोग कैलास अडसुरे या विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे कृषी तंत्र विद्यार्थी वर्गात खळबळ उडाली आहे.

बुधवारी सकाळी ११ वाजता कृषी तंत्र विद्यालयात प्रथम व द्वितीय वर्षाच्या विद्यार्थी वर्गाने मागणी केल्यामुळे निरोप समारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यासाठी विद्यार्थी वर्गाने प्राचार्यांकडे रितसर लेखी अर्ज सादर केला होता. विद्यालयात गुरुवारी पुरवणी प्रात्यक्षिक परीक्षा सुरु होणार असल्यामुळे विद्यालयाने बुधवारीच कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या विद्यालयात प्रथम वर्षासाठी ३८ व द्वितीय वर्षासाठी ३७ विद्यार्थी आहेत. बुधवारी १२ ते १ च्या दरम्यान येथील सभागृहात निरोप समारंभाचा कार्यक्रम संपन्न झाला. त्यानंतर विद्यार्थी वर्गाने निरोप समारंभाचा आनंद घेण्यासाठी विद्यालयाच्या प्रांगणातच साऊंड सिस्टीम लावून आनंद घेण्यास सुरुवात केली. अनेक विद्यार्थी उल्हासित होऊन नाचत असताना सुयोग आडसुरे हा चक्कर येऊन पडला. हे पाहताच त्याचे सहकारी मित्र व शिक्षकांनी त्याला तातडीने पुणतांबा येथील खासगी रुग्णालयात तसेच ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र त्याची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे डॉक्टरांनी त्यांना श्रीरामपूर येथील कामगार हॉस्पीटलमध्ये पुढील उपचारासाठी हलविण्याची सूचना केली. त्यानुसार त्याला कामगार हॉस्पिटलमध्ये घेऊन जाताना त्याचे रस्त्यातच निधन झाले. असे त्याच्या समवेत रुग्णवाहिकेत असलेल्या शिक्षक व मित्रांनी सांगितले. अखेर पाच वाजता त्याला साखर कामगार हॉस्पिटल श्रीरामपूर येथे दाखल केले. डॉक्टरानी तपासणी केली असता त्याचे रस्त्यातच निधन झाल्याचे सांगितले.

सुयोग अडसुरे हा राहुरी तालुक्यातील खरवंडी गावचा असून त्याचे वडील कृषी विद्यापीठात सेवेत आहे. तो पुणतांबा येथे कृषी विद्यालयाच्या वसतिगृहात राहत होता. त्याचा शवविच्छेदना चा अहवाल आल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण समजणार आहे.

Web Title: Unfortunate death of a student studying Agriculture Diploma in Krishi 

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here