संगमनेर: अल्पवयीन विवाहिता प्रसूत; बालविवाहासह पोक्सोंतर्गत गुन्हा
Breaking News | Sangamner: प्रसूतीसाठी तिला रूग्णालयात दाखल केल्यानंतर हा प्रकार उघडकीस पिडित मुलीचा पती, सासू सासऱ्यासह आई-वडिलाविरुद्ध अतिसंगासह, बाल विवाह प्रतिबंध व पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल.
संगमनेर: लोणी येथील एका रुग्णालयात प्रसूतीस गेलेल्या विवाहितेचे वय कमी आहे, असे डॉक्टरांच्या लक्षात आल्यानंतर मुलीच्या जबाबावरून घारगाव पोलिसांनी संगमनेर तालुक्यातील पठार भागातील रहिवासी पिडित मुलीचा पती, सासू सासऱ्यासह आई-वडिलाविरुद्ध अतिसंगासह, बाल विवाह प्रतिबंध व पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, गर्भवती युवतीची प्रसूती होवून तिला मुलगी झाली आहे.
मुलीचे वय कमी असताना तिचा विवाह करण्यात आला. यातून ती गर्भवती राहिली. प्रसूतीसाठी तिला रूग्णालयात दाखल केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. दरम्यान, बाल विवाह लावणाऱ्या भटजीचा पोलिस शोध घेत आहेत. दीड वर्षांपूर्वी पठार भागातील एका गावातील कुटुंबियांनी नात्यातील मुलगी सून करून आणली. भावाची मुलगी बहिणीने सून करुन, घरात आणल्यानंतर ती काही दिवसांनी गर्भवती राहिली. चार दिवसांपूर्वी तिला लोणी येथे एका रुग्णालयात बाळंतपणास दाखल केले असता, कागदपत्रांसह इतर बाबींवरून हा प्रकार समजला. नात्यातल्या मुलाशी तिचा विवाह त्या नवरदेवाच्या दारासमोर मंडप टाकून केल्याचे तिने जबाबात म्हटले आहे.
Web Title: Underage marriage Offenses under POC
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study