Home क्राईम संतापजनक! घरात कोणी नसताना चार वर्षीय भाचीवर मामाने केला लैंगिक अत्याचार

संतापजनक! घरात कोणी नसताना चार वर्षीय भाचीवर मामाने केला लैंगिक अत्याचार

Nagpur Crime: घरात मैत्रिणीसह खेळत असलेल्या चार वर्षीय भाचीवर मावसमामाने लैंगिक अत्याचार (Sexually abused) केल्याची घृणास्पद घटना.

Uncle sexually abused four-year-old niece when no one was home

नागपूर: घरात मैत्रिणीसह खेळत असलेल्या चार वर्षीय भाचीवर मावसमामाने लैंगिक अत्याचार केल्याची घृणास्पद घटना कळमन्यात उघडकीस आली आहे.  विष्णू (२८) असे आरोपी युवकाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, , पीडित चार वर्षीय मुलगी ही आईसह राहते. तिची आई कळमना मार्केटमध्ये काम करते. तिच्या घराशेजारी तिचा मामा विष्णू हा राहतो. तो अविवाहित असून विकृत मानसिकतेचा आहे. १७ एप्रिलला सकाळी ११ वाजता चार वर्षीय मुलगी १० वर्षीय मैत्रिणीसह खेळत होती. दरम्यान विष्णू हा घरी आला. त्याने दुसऱ्या मुलीला २० रुपये दिले आणि दुकानातून बिस्किट आणायला पाठवले. त्यानंतर विष्णूनेे मुलीवर लैंगिक अत्याचार केला. काही वेळानंतर ती मुलगी परतली. तिला मुलगी रडताना दिसली. तिने कारण विचारले असता तिने घडलेला प्रकार सांगितला.

दोन्ही मुली कुटुंबियांना सांगतील, ही भीती विष्णूला होती. त्यामुळे त्याने दोघीनाही जीवे मारण्याची धमकी दिली आणि घरून निघून गेला. मुलींनी घरी गेल्यानंतर कुटुंबियांना सांगितले. मुलीच्या आईने कळमना पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.

Web Title: Uncle sexually abused four-year-old niece when no one was home

See Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here