Home अकोले नाशिक येथील एसटी अपघातात अकोले तालुक्यातील मामा-भाचा ठार

नाशिक येथील एसटी अपघातात अकोले तालुक्यातील मामा-भाचा ठार

Nashik Accident: पेट्रोलमुळे टाकीचा स्फोट झाला आणि गाडी बसखाली अडकली. शेकडो लोकांच्या डोळ्यांदेखत दोघे तरुण जिवंत जळाले.

Uncle-nephew from Akole taluk killed in ST accident in Nashik

अकोले: तालुक्यातील समशेरपूर येथील मामा-भाचे दुचाकीवर नाशिक येथे लग्नाला गेले होते. तिकडून परतत असताना शिंदे पळसे परिसरात त्यांना एका बसने मागून धडक दिली. दोन्ही बसच्या मध्ये यांची गाडी सापडली. पेट्रोलमुळे टाकीचा स्फोट झाला आणि गाडी बसखाली अडकली. शेकडो लोकांच्या डोळ्यांदेखत दोघे तरुण जिवंत जळाले.

ही घटना आज, दि. ८ डिसेंबर २०२२ रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घडली. यात मदन दिनकर साबळे (वय ४०) व रवींद्र सोमनाथ विसे ( वय ३२, दोघे रा. समशेरपूर, ता. अकोले) हे दोघे मयत झाले आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, मदन आणि रवी या दोघांना औरंगाबाद रोड नाशिक येथे एका मित्राच्या साखरपुड्याला आणि पाथर्डी फाटा नाशिक येथे लग्नाला जायचे होते. सकाळीच दोघे आपली एम.एच. १५.जी. एच. १२०१ ही दुचाकी घेऊन नाशिकला निघाले होते.

Business Idea in Marathi | कमी खर्चात घरबसल्या करता येणारे नवीन बिजनेस | Low Investment Business

दोन्ही कार्यक्रम आटोपल्यानंतर ते आपल्या गावाकडे निघाले असता शिंदे पळसे परिसरात असताना पुढे एक बाजूला झाला. आरामदायी बसगाडी चालली होती. तिच्या मागे हे दोघे दुचाकीने हळूहळू चालले होते. पुढील कोणत्याही गाड्यांना वेग नव्हता. वाहतूककोंडी झाल्यामुळे पुढील वाहने संथ गतीने सुरू होती.

दरम्यान, एक एसटी बस मागून भरधाव आली. तिने दोघांना जोरात धडक देऊन पुढील आरामदायी गाडीलासुद्धा उडवले. हा प्रकार तेथील एका सीसीटीव्हीत कैद झाला आहे. दोन्ही गाड्यांच्या मधोमध यांची दुचाकी फसली. त्यामुळे दुचाकीने पेट घेतला. काही क्षणात बसच्या इंजिननेदेखील पेट घेतला. बसमध्ये ६० ते ७० प्रवासी होते. वाहन चालक कोणत्याही प्रकारचे प्रसंगावधान न राखता खाली उतरून

प्रवाशांनी गाडीच्या काचा फोडून आणि संकटकालीन मार्गाने गाडीतून बाहेर येण्याचा प्रयत्न केला. लहान मुलांना काहींनी खिडक्यांमधून बाहेर टाकल्याने अनर्थ टळला.

Web Title: Uncle-nephew from Akole taluk killed in ST accident in Nashik

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here