प्रवरा नदीत पोहण्यास गेलेल्या मामा-भाच्याचा पाण्यात बुडून मृत्यू
Breaking News | Ahilyanagar: प्रवरा नदीपात्रात अंघोळीसाठी पोहायला गेलेल्या मामा-भाच्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना.
पाचेगाव | नेवासा : पाचेगाव (ता. नेवासा) येथील प्रवरा नदीपात्रात अंघोळीसाठी पोहायला गेलेल्या मामा-भाच्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि. २१) दुपारी दीडच्या सुमारास घडली.
किरण सुरेश देठे (अंदाजे वय २८, रा. पाचेगाव, ता. नेवासा) व त्याचा भाचा अनुज प्रवीण भालेराव (अंदाजे वय १३, रा. खोसपुरी, ता. अहिल्यानगर), अशी पाण्यात बुडून मृत्यू पावलेल्या मामा- भाच्याची नावे आहेत.
मयत अनुज भालेराव याला पोहता येत नव्हते. नुकताच तो आई- वडिलांसोबत दिवाळी सणासाठी पाचेगाव येथील मामाकडे आला होता. आपला एकुलता एक मुलगा पाण्यात बुडून मृत्यू पावल्याचे लक्षात येताच त्याच्या आई-वडिलांनी घटनास्थळीच किरण देठे अनुज भालेराव हंबरडा फोडला. गावातील स्थानिक तरुणांनी मासेमारीचे साहित्य वापरून अर्ध्या तासाच्या अथक प्रयत्नानंतर पाण्यात बुडालेले दोन्ही मृतदेह बाहेर काढले.
यावेळी घटनास्थळी गावातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. मृतदेह पाण्याबाहेर काढल्यानंतर शवविच्छेदनासाठी नेवासा ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. शवविच्छेदन केल्यानंतर रात्री उशिरा दोघांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रकरणी नेवासा ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या अहवालावरून नेवासा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास नेवासा पोलिस ठाण्याचे पोलिस नाईक अशोक लिपणेसह समीर शेख करीत आहेत.
Web Title: Uncle-nephew drowned while swimming in Pravara river
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study