Home अहमदनगर मामा-भाच्याने बँकेतून काढले २.९२ लाख महिलेची फसवणूक

मामा-भाच्याने बँकेतून काढले २.९२ लाख महिलेची फसवणूक

Ahmednagar News; न्यायालयाच्या आदेशाने गुन्हा दाखल, सह्या असलेल्या चेकचा – गैरवापर करून मामा-भाच्याने महिलेच्या खात्यातून दोन लाख ९२ हजार रूपये काढून घेतले व ते देण्यास टाळाटाळ केल्याची घटना.

Uncle-nephew defrauded 2.92 lakh women from the bank

अहमदनगर:  सह्या असलेल्या चेकचा – गैरवापर करून मामा-भाच्याने महिलेच्या खात्यातून दोन लाख ९२ हजार रूपये काढून घेतले व ते देण्यास टाळाटाळ केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशाने मामा-भाच्या विरोधात गुरूवारी (दि. १४ डिसेंबर) दुपारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. मनीषा पांडुरंग गरड (वय ४७ रा. वैजुबाभुळगाव ता. पाथर्डी) यांनी फिर्याद दिली आहे.

सचिन भाऊसाहेब म्हस्के व त्याचा मामा संजय गोरक्ष आमले (दोघे रा. वैजुबाभुळगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. सदरचा प्रकार आयसीआयसीआय बँकेच्या एमआयडीसीतील शाखेत २६ एप्रिल २०१७ ते ४ जुलै २०२० दरम्यान घडला आहे. म्हस्के व आमले यांनी मनीषा गरड यांचा विश्वास संपादन करून आयसीआयसी बँकेच्या एमआयडीसी शाखेत त्यांचे खाते उघडले. त्या खात्यावर चार लाख रूपयांचे कर्ज मंजूर करून घेतले. गरड यांच्याकडून त्यांच्या सह्याचे चेक पुस्तक घेतले. जुने-नवे कर्ज देतो असे सांगून वेळोवेळी म्हस्के याने त्याचा मामा आमले याच्या खात्यावर व स्वतः च्या खात्यावर चेक जमा करून एकूण दोन लाख ९२ हजार रुपये काढून घेतले. गरड यांनी म्हस्के व आमले यांच्याकडे पैशाची मागणी केली असता त्यांनी पैसे देण्यास वेळोवेळी टाळाटाळ केली. त्यानंतर गरड यांनी यासंदर्भात येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात तक्रार दाखल केली होती. न्यायालयाने सीआरपीसी १५३ (३) प्रमाणे गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार गरड यांनी गुरूवार, १४ डिसेंबर २०२३ रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दोघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक पाठक करीत आहेत.

Web Title: Uncle-nephew defrauded 2.92 lakh women from the bank

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here