Murder: शेतीच्या वादातून काकानेच केला पुतण्याचा खून
भंडारा | Murder Case: शेतीच्या हिस्सेवाटणीच्या वादातून काकाने पुतण्याचा खून केल्याची घटना घडली आहे. मोहाडी तालुक्यातील रामपूर येथे शुक्रवारी सकाळी साडे आठ वाजेच्या सुमारास घडली. काठीने जोरदार वार केल्याने पुतण्याचा जागीच मृत्यू झाला आहे.
याप्रकरणी मोहाडी पोलिसांनी काकासह सात जणांना अटक केली आहे. रविंद्र श्यामराव सव्वालाखे वय ३८ रा. रामपूर असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
याप्रकरणी शोभेलाल उपासू सव्वालाखे वय ५७, शिवा उपासू सव्वा लाखू वय ५५, बाबूलाल उपासू सव्वालाखे वय ५३, गेंदलाल जलकण सव्वालाखे वय ३५ रा. रामपूर अशी या आरोपींची नावे आहेत,
हिस्सेवतानी ही काही दिवसांपूर्वी झाली होती. परंतु झालेल्या वाटणीवरून कुटुंबामध्ये धूसफूस होती. जागेचा वाद सुरु होता.
रविंद्र सव्वालाखे हा शुक्रवारी सकाळी साडे आठ वाजता शेतात गेला होता. त्यावेळी याच कारणातून वाद झाला. या वादातून सात जण काठ्या घेऊन आलेत. रवींद्रच्या डोक्यात काठीने जोरादार वार केला. यामध्ये तो जागीच ठार झाला. भांडणाचा आवाज ऐकून लहान भाऊ धावत आला. त्यावेळी त्यांच्या मागेही हातात काठ्या घेऊन मारायला धावले. यामध्ये किरकोळ जखमी झाला असून त्याने पळ काढला.
या घटनेची माहिती मोहाडी पोलिसांना देण्यात आली. ठाणेदार राहुल देशपांडे व इतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. भाऊ देवेंद्र यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच सर्व आरोपींना काही तासांतच अटक केली आहे.
Web Title: Uncle Murder his nephew in an agricultural dispute