उध्दव ठाकरे तुम्हाला आणि तुमच्या मुलाला लवकरच राजीनामा द्यावा लागेल
मुंबई: अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांच्या आत्महत्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणीला सुरुवात झाली आहे. या प्रकरणात पाटणा पोलिसांकडे सुशांतच्या वडिलांनी दाखल केलेली तक्रार ही ग्राह्य धरून बिहार पोलिसांनी चौकशी न करता या प्रकरणाची चौकशी मुंबई पोलिसांना करून देण्यात यावी यासाठी याचिका दाखल करण्यात आली. मात्र या सुनावणीदरम्यान पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या नावाचा उल्लेख सर्वोच्च न्यायालयामध्ये झाल्याचा दावा भाजपाचे नेते निलेश राणे यांनी केला आहे. त्यामुळेच या प्रकरणामुळे उध्दव ठाकरे आणि त्याच्या मुलाला राजीनामा द्यावा लागेल असे वक्तव्य निलेश राणे यांनी केले आहे.
निलेश राणे यांनी ट्विटर वरून उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर निशाना साधला आहे. उध्दव ठाकरे तुमच्या मुलाच नाव सुप्रीम कोर्टाच्या रेकॉर्ड मध्ये आले. आदित्य ठाकरेंचा सुशांत सिंह राजपुतच्या केसमध्ये सहभाग जाणवतो. तुम्हाला आणि तुमच्या मुलाला लवकरच राजीनामा द्यावा लागेल. कारण ह्या केसमध्ये तुम्ही आणि तुमच्या मुलाने पदाचा दुरुपयोग केला आहे. अस ट्वीट निलेश राणे यांनी केलं आहे. मागील काही दिवसांपासून आदित्य ठाकरे यांचा या प्रकरणाशी संबंध असल्याचा दावा करणारे अनेक लोक तर्कवितर्क सोशियल मेडीयावर व्हायरल झाल्याचे पाहायला मिळत आहे.
मात्र या प्रकरणाचा आदित्य ठाकरे यांच्याशी काहीही संबंध नाही असे शिवसेनेचे खासदार संजय राउत यांनी स्पष्ट केलेले आहे.
Web Title: Uddhav Thackeray You and your son will have to resign soon
Get Latest Marathi News and Ahmednagar News