मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे पंतप्रधानांना पत्र: कोरोनाला नैसर्गिक आपत्ती घोषित करा
मुंबई: कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ब्रेक द चैन या मोहिमेची घोषणा केली आहे. आजपासून संपूर्ण राज्यात संचारबंदी लागू केली आहे. राज्यात पुढील १५ दिवस कलम १४४ लागू असेल.
कोरोनाच्या वाढत्या प्रदुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी (Uddhav Thackeray) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. कोरोनाला नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित करण्याची मागणी या पत्रात केली आहे. याचबरोबर राज्य आपत्ती मदत निधीच्या माध्यमातून प्रभावित व्यक्तीना मदत करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनी पत्रात राज्याला ऑक्सिजन पुरवठ्याचीही मागणी केली आहे.
मुख्यमंत्री ठाकरे यांनी मंगळवारी जनतेशी संवाद साधला. भूकंप, पूर, अवर्षण आल्यानंतर नैसर्गिक आपत्ती जाहीर केली जाते. त्यानंतर त्याचा फटका बसलेल्याना आर्थिक मदत दिली जाते. कोरोना संकटाला आपण सर्वांनी एक नैसर्गिक आपत्ती म्हणून स्वीकारली आहे. त्यामुळे ज्यांची उपजीविका संकटात सापडली आहे. त्यांना आर्थिक मदत दिली जावी असेही मुख्यमंत्री म्हणाले होते.
Web Title: Uddhav Thackeray letter to PM Declare Corona a natural disaster