धनगर आरक्षण आंदोलनात दोन तरुणांनी केले विष प्राशन
धनगर आरक्षण आंदोलनात दोन तरुणांनी केले विष प्राशन
अहमदपुर : धनगर समाजास अनुसुचित (एसटी) प्रवर्गात आरक्षण मिळावे या व आदी मागण्यांसाठी महाराष्ट्र धनगर आरक्षण अंमलबजावणी समितीच्या वतीने येथील तहसील कार्यालयावर सोमवारी दि.२७ ढोल जागर आंदोलन करण्यात आले. दरम्यान या आंदोलनवेळी दोन तरुणांनी विष प्राशान केल्याने त्यांना तातडीने लातुरच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
You May Also Like: Deepika Padukone Ranveer Singh Marriage Date
भाजप आघाडी सरकारने सत्तेत आल्यावर पहिल्याच बैठकीत धनगर समाजास एसटी संवर्गाचे आरक्षण देण्याचा ठराव मंजुर करु, असे आश्वासन निवडकीपुर्वी सकल धनगर समाजास दिले होते, परंतु ते आश्वासन सरकारने पाळले नाही. त्यामुळे तमाम धनगर समाजाने शासनाची पुन्हा एकदा कानउघाडझी करण्यासाठी व शासनाचे लक्ष वेधण्यासाठभ् महाराष्ट्रातील येथील तहसील कार्यालयासमोर सोमवारी ढोल जागर आंदोलन करण्यात आले. यावेळभ् तालुक्यातील समाजाचे सर्वपक्षीय नेते कार्यकर्ते बहुसंख्यने उपस्थित होते. या वेथ्ळभ् समाजातील सर्वपक्षीय नेत्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन प्रभारी तहसीलदार एकनाथ आयतलवाड यांना दिले.
दरम्यान तहसीलसमोरील आंदोलनावेळीच (एसटी) माधव नारायण देवकत्ते (३५, रा. शिंदगाी खुर्द)व बालाजी भीमरात देवकत्ते (३५ रा. व्हटाळ) यांनी विष प्राशन केले. त्यांना तातडीने येथील ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करुन पुढील उपचारासाठी लातुरच्या जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमृत चिवडे यांनी सांगितले.
मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा
आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. रहा अपडेट दररोज. धन्यवाद. मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा.
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा. आपल्याला ही बातमी आवडल्यास फेसबुक वर जरूर शेअर करा धन्यवाद.