Home पुणे डंपर पलटी होऊन दोन तरुणी विद्यार्थिनींचा मृत्यू, चेंदामेंदा शरीराचे तुकडे

डंपर पलटी होऊन दोन तरुणी विद्यार्थिनींचा मृत्यू, चेंदामेंदा शरीराचे तुकडे

Pune Accident News: वाहनावरील चालकाचं नियंत्रण सुटलं. यामुळं रेडिमिक्स डंपर पलटी झाला, पण दुर्दैवाने त्याचवेळी रेडिमिक्स डंपरखाली शेजारून जात असलेली दुचाकी दबली गेली, दुचाकीवरील दोन विद्यार्थिनींचा जागीच दुर्दैवी मृत्यू.

Two young female students died after the dumper overturned Accident

पुणे: पुण्यात गेल्या काही दिवसांमध्ये अपघाताच्या मोठ्या घटना समोर येत आहेत. अशातच हिंजवडीत झालेल्या एका घटनेमध्ये दोन विद्यार्थीनींचा हकनाक बळी गेल्याची संतापजनक घटना घडली आहे  (Pune. हिंजवडीत भरधाव वेगात निघालेला रेडिमिक्स डंपर वळणावर आला आणि वाहनावरील चालकाचं नियंत्रण सुटलं. यामुळं रेडिमिक्स डंपर पलटी झाला, पण दुर्दैवाने त्याचवेळी रेडिमिक्स डंपरखाली शेजारून जात असलेली दुचाकी दबली गेली, दुचाकीवरील दोन विद्यार्थिनींचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. क्रेनच्या साह्यानं रेडिमिक्स डंपर हटविण्यात आला. चालकाला हिंजवडी पोलिसांनी ताब्यात घेतलं असून विद्यार्थिनींची ओळख पटवण्यात आली आहे. या दोघींही पुणे शहरामध्ये शिक्षणासाठी आल्या असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

ही घटना हिंजवडी- माण रस्त्यावरील वडजाईनगर कॉर्नरजवळ काल (शुक्रवारी 24 रोजी) सायंकाळच्या सुमाराल घडली आहे. डंपरचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

या दुर्दैवी घटनेमध्ये दोन विद्यार्थिनींचा दुर्दैवी बळी गेल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. भरधाव रेडीमिक्स डंपर वळण घेताना अचानक पलटी झाला. त्याच वेळी शेजारून दुचाकीवरून चाललेल्या दोन विद्यार्थिनी डंपरखाली सापडल्या आणि चिरडल्या गेल्या.

प्रांजली महेश यादव (वय – 22, रा. गोदरेज प्रॉपर्टीज्, म्हाळुंगे; मूळ रा. टेंभुर्णी, ता. माढा) आणि आश्लेषा नरेंद्र गावंडे (वय – 22, रा. गोदरेज प्रॉपर्टीज्, म्हाळुंगे; मूळ रा. शेगाव, अमरावती) अशी मृत्युमुखी पडलेल्या दोन विद्यार्थिनींची नावे आहेत. या दोघी एमआयटी कॉलेजध्ये अभियांत्रिकेच्या शेवटच्या वर्षात शिकत होत्या. काल (शुक्रवारी) सायंकाळी त्या दुचाकीवरून चालल्या होत्या. वडजाईनगर कॉर्नरजवळ भरधाव आलेल्या डंपरचालकाचे वळणावर नियंत्रण सुटल्यानं डंपर पलटी झाला. प्रांजली आणि आश्लेषा या डंपरखाली सापडल्या गेल्या. तीन क्रेनच्या मदतीने डंपर बाजूला घेण्यात आला.

Web Title: Two young female students died after the dumper overturned Accident

See also: Latest Marathi News,  Breaking News liveSangamner NewsAhmednagar News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here