अहमदनगर: जलसंपदाच्या दोन महिला अभियंता अडकल्या लाचेच्या जाळ्यात
Breaking News | Ahmednagar: बिलासाठी मागितली लाच (Bribe), दोघींवर गुन्हा दाखल.
अहमदनगर : जलसंपदा विभागाच्या नाशिकच्या ‘मेरी’ येथील कार्यकारी अभियंता रजनी पाटील व अहमदनगर येथील संशोधन व जलनिःसारण उपविभागातील रुबिया शेख यांना लाचलुचपत विभागाने लाच घेताना पकडले आहे.
राहुरी तालुक्यातील उंबरी येथील अंतर्गत पाटचाऱ्याच्या दुरुस्तीचे ठेकेदाराचे पावणेआठ लाख रुपयांचे बिल काढण्यासाठी या दोघींनी १८ टक्क्यांप्रमाणे १ लाख ३९ हजार रुपयांची लाच मागितली होती. यात रुबिया यांचा स्वतःचा वाटा आठ टक्के व रजनी पाटील यांचा दहा टक्के वाटा होता.
१ लाख ३९ हजार रुपयांच्या रकमेपैकी ६२ हजारांचा पहिला हप्ता शेख यांनी गुरुवारी स्वीकारला. त्यावेळी सापळा लावून त्यांना पकडण्यात आले. त्या रजनी पाटील यांच्यासाठीदेखील ही लाच घेत होत्या याचीही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने खात्री केली असता त्यास दुजोरा मिळाला. त्यामुळे या दोघींविरोधात येथील तोफखाना पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.
ही कारवाई पोलिस उपअधीक्षक प्रवीण लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक शरद गोर्डे, रवींद्र निमसे, बाबासाहेब कराड, किशोर लाड, राधा खेमनर, सना सय्यद यांच्या पथकाने केली.
Web Title: Two women engineers of water resources were caught in the net of bribery
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study