Home पुणे मित्रांसोबत पर्यटनासाठी गेलेल्या दोघांचा तलावात बुडून मृत्यू

मित्रांसोबत पर्यटनासाठी गेलेल्या दोघांचा तलावात बुडून मृत्यू

Breaking News | Mulshi: मित्रांसमवेत पर्यटनासाठी गेलेल्या दोन महाविद्यालयीन तरुणांचा तलावातील गाळात बुडून मृत्यू.

Two who went on a trip with friends drowned in the lake

पौड : मित्रांसमवेत पर्यटनासाठी गेलेल्या दोन महाविद्यालयीन तरुणांचा तलावातील गाळात बुडून मृत्यू झाला. खांबोली (ता. मुळशी) हद्दीत रविवारी (दि. २०) सकाळी साडेनऊ वाजता हा घटना घडली.

ओजस आनंद कठापूरकर (वय २२, रा. प्राधिकरण निगडी, पुणे) आणि राज संभाजी पाटील (वय २२, रा. अमळनेर, जि. जळगाव) अशी मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत. कठापूरकर व पाटील हे दोघे पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात शिकत होते. दोघेही त्यांचे मित्र आदेश राजेंद्र भिडे, सुमेध सतीश जोशी, प्रशांत संभाजी आरगडे, तेजस्विनी साहेबराव पवार, निधी सत्यनारायण हळदंडकर, तृप्ती चंद्रकांत देशमुख, चैतन्या जयंत कांबळे हे नऊ जण दुचाकीवरून रविवारी सकाळी खांबोली तलावाजवळ पर्यटनासाठी आले होते. सर्वजण पाण्यात उतरले होते. या वेळी कठापूरकर व पाटील गाळात अडकले आणि ते गाळात बुडू लागले, तर पाण्यातून बाहेर आले. ते या दोघांना वाचविण्यात असमर्थ ठरले.

या घटनेची माहिती स्थानिकांना देण्यात आली. त्यानंतर स्थानिकांनी कठापूरकरला पाण्यातून बाहेर काढले असता स्थानिक डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मात्र, पाटील बुडाल्याने तो सापडला नाही. दरम्यान अग्निशामक दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आले. काही वेळात जवानांना पाटीलचा मृतदेह मिळून आला.

पौडचे पोलिस संतोष गिरीगोसावी यांनी घटनास्थळी दाखल होत पाहणी केली. पोलिस हवालादार रवींद्र नागटिळक, ईश्वर काळे, अमोल सूर्यवंशी, अग्निशामकचे जवान व स्थानिकांनी मृतदेह बाहेर काढण्यासाठी मदत केली. दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी पौड ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. पौड पोलिस पुढील तपास करत आहेत.

Web Title: Two who went on a trip with friends drowned in the lake

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here