Home अहमदनगर अहमदनगर: पंक्चर काढण्यासाठी थांबलेल्या दोघांना चिरडले एक ठार एक जखमी

अहमदनगर: पंक्चर काढण्यासाठी थांबलेल्या दोघांना चिरडले एक ठार एक जखमी

Breaking News | Ahmednagar: राळेगणसिद्धी फाट्यालगत चार चाकी वाहनाजवळ उभ्या असलेल्या दोन व्यक्तींना अज्ञात वाहनाची धडक बसून झालेल्या अपघातात एक व्यक्ती जागीच ठार.

Two who stopped for puncture were crushed, one killed 

पारनेर:  महामार्गावर शुक्रवारी पहाटे राळेगणसिद्धी फाट्यालगत चार चाकी वाहनाजवळ उभ्या असलेल्या दोन व्यक्तींना अज्ञात वाहनाची धडक बसून झालेल्या अपघातात एक व्यक्ती जागीच मृत पावली तर आणखी एक गंभीर जखमी झाला आहे.

याबाबत डॉ. गोपाळ गुणवंत पवार (रा. जरडी, ता. सोयागाव, जि. छत्रपती संभाजीनगर) यांनी सुपा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले, शुक्रवार १९ जुलैला माझे भाऊ गणेश गुणवंत पवार व वाहनचालक जखमी राहुल लिंबाजी राठोड हे वाहन क्रमांक एमएच १९ सीएक्स ०४२४ या गाडीने घरगुती सामान घेऊन पुण्याच्या दिशेने जात असताना पहाटे ५.३० वाजण्याच्या दरम्यान राळेगणसिद्धी फाट्याजवळ गाडी पंक्चर झाली म्हणून थांबून गाडीचे पंक्चर काढत होते. त्यावेळी नगरकडून येणाऱ्या अज्ञात वाहनाने पंक्चर काढत असलेल्या वाहनाच्या जवळ असणारे गणेश पवार व चालक राहुल राठोड यांना जोराची धडक देत निघून गेले. ही धडक एवढी जोराची होती की यात गणेश पवार हे जागीच ठार झाले. तर राठोड हे जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच सुपा पोलीस ठाण्याचे संदीप पवार, रुग्णवाहिका चालक शादीकभाई अपघातस्थळी झाले. जखमी राठोड यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पुढील तपास सुपा पोलीस करत आहेत.

Web Title: Two who stopped for puncture were crushed, one killed 

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here