Accident: अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वराचा मृत्यू
पाथर्डी | Accident | Pathardi: नगरहून सुसरेकडे ता. पाथर्डी चाललेल्या दुचाकीस्वाराला अमरापूरजवळ ता. शेवगाव अज्ञात वाहनाने धडक दिली. या धडकेत जखमी झालेल्या युवकाला अहमदनगर येथे उपचारासाठी घेऊन जात असताना त्याचा मृत्यू झाला. गुरुवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास ही घटना घडली.
संदीप भानुदास मुखेकर वय २८ रा. मुखेकरवाडी कोरडगाव ता. पाथर्डी असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. संदीप मुखेकर हे सकाळी १० वाजता नगरहून सुसरे येथे दुचाकीवरून चालले होते. अमरापूरजवळ ता. शेवगाव अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त गंभीर जखमी झाला. त्यांना पाथर्डीच्या उप जिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी हलविण्यात आले. तेथून नगर येथे उपचारासाठी घेऊन जात असताना त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्यावर मुखेकरवाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. या अपघातातील अज्ञात चालक फरार झाला आहे.
Web Title: Two-wheeler killed in collision with unknown vehicle Accident