दोघे बडतर्फ तर एका गुरूजीला सेवेतून कमी केले, संगमनेरचे दोघे
Ahmednagar: प्राथमिक शिक्षक यांच्यावर गैरवर्तनाचा ठपका ठेवण्यात, तीन प्राथमिक शिक्षकांना मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी गंभीर शिक्षा दिली. दोघांना सेवेतून बडतर्फ तर एकास सेवेतून कमी, दोघे संगमनेरचे (Sangamner) तर एक श्रीरामपूर तालुक्यातील.
अहमदनगर: जिल्ह्यातील तीन प्राथमिक शिक्षकांना मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी गंभीर शिक्षा दिली आहे. यात दोघांना थेट सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. एका शिक्षकाला सेवेतून कमी करण्यात आले आहे. यातील शिक्षा झालेले दोघे शिक्षक हे संगमनेर तालुक्यातील आहेत, तर एक शिक्षक हा श्रीरामपूर तालुक्यातील आहे.
सोमाजी मधे पद्वीधर शिक्षक आणि कैलास दिघे प्राथमिक शिक्षक यांच्यावर गैरवर्तनाचा ठपका ठेवण्यात येवून त्यांची चौकशी करण्यात आली होती. या चौकशीत मधे आणि दिघे हे दोषी आढळण्यानंतर सोमवारी दुपारी मुख्य कार्यकारी अधिकारी येरेकर यांनी दोघांना सेवेतून बडतर्फ करण्याचे आदेश काढले आहेत.
Earn Money Online | सोशियल मेडिया मनोरंजनासोबत पैसे कमविण्याचा फंडा | जाणून घ्या
या बडतर्फीच्या आदेशामुळे दिघे आणि मधे यांना शासकीय सेवेतील कोणतेच लाभ मिळणार नाही. तर सतत गैरहजर राहणार्या श्रीरामपूर तालुक्यातील राजेंद्र रघुनाथ रावळे उपाध्यपक या शिक्षकाला सेवेतून काढून टाकले आहे. सेवेतून काढून टाकण्याच्या शिक्षेमुळे शासन पातळीवरून आदेश झाल्यास रावळे याला शासकीय सेवेचे लाभ मिळू शकतात.
या तिघा प्राथमिक शिक्षकांना मुख्य कार्यकारी अधिकारी येरेकर यांनी कडक शिक्षा दिल्यामुळे जिल्हा परिषदेसह जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
Web Title: Two were dismissed and one Guruji was reduced from service
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App