Home संगमनेर संगमनेर: अवैध वाळूची वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर-ट्रॉली पकडले

संगमनेर: अवैध वाळूची वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर-ट्रॉली पकडले

Breaking News | Sangamner: अवैधरीत्या उपसा करत वाळूची वाहतूक होत असलेले दोन ट्रॅक्टर ट्रॉली महसूल विभागाच्या पथकाने पकडले.

Two tractor-trolleys carrying illegal sand were seized

संगमनेर:  अवैधरीत्या उपसा करत वाळूची वाहतूक होत असलेले दोन ट्रॅक्टर ट्रॉली महसूल विभागाच्या पथकाने पकडले. ही कारवाई रविवारी (दि. २३) पहाटे तीन वाजेच्या सुमारास संगमनेर तालुक्यातील बोरबनवाडी येथे करण्यात आली. महसूल पथकाने जप्त केलेले विना क्रमांकाचे दोन ट्रॅक्टर- ट्रॉली घारगाव पोलिसांच्या ताब्यात दिले.

दत्तात्रय गंगाधर गाडेकर व स्वप्नील तान्हाजी गाडेकर (रा. बोरबनवाडी, ता. संगमनेर) अशी ट्रॅक्टर मालकांची नावे असल्याचे तलाठी दादा शेख यांनी सांगितले. आंबी खालसा गावाच्या बाजूने मुळा नदीपात्रातून वाळूचा अवैधरीत्या उपसा करत ट्रैक्टर- ट्रॉलीमधून वाळूची वाहतूक बोरबनवाडी गावच्या परिसरात होत असल्याची माहिती तलाठी शेख यांना मिळाली होती.

त्यांनी कोतवाल शशिकांत खोंड यांना बरोबर घेतले. रात्री दोन ट्रॅक्टर सराटी येथील एका मंदिराजवळून घारगावच्या दिशेने खोबरेवाडीकडे जात असताना त्यांना दिसले. त्यांनी चालकांना थांबविले असता वाळूचा परवाना नव्हता.

एक ट्रॅक्टरचालक ट्रॅक्टर बंद करून चावी घेऊन पसार झाला. दुसऱ्याने ट्रॅक्टर पळविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तलाठी शेख यांनी तलाठी युवराजसिंग जारवाल, सोमनाथ शेरमाळे यांना बोलावून घेत दोनही ट्रॅक्टर ताब्यात घेऊन घारगाव पोलिसांच्या स्वाधीन केले. तलाठी शेख यांनी अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर अडविले असता त्यांना वाळू तस्करांनी अरेरावी करण्याचा प्रयत्न केला.

तलाठी शेख यांनी पोलीस निरीक्षक संतोष खेडकर यांना कळविले असता त्यांनी पोलिस कॉन्स्टेबल गणेश तळपाडे व नामदेव बिरे यांना तत्काळ घटनास्थळी पाठविले.

Web Title: Two tractor-trolleys carrying illegal sand were seized

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here