Home संगमनेर संगमनेरातील गंगामाई घाटावर दोन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

संगमनेरातील गंगामाई घाटावर दोन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

Breaking News | Sangamner: गंगामाई  घाटावर दोन विद्यार्थी पोहण्यासाठी गेले असता त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना.

Two students drowned at Gangamai Ghat in Sangamner

संगमनेर: शहरालगत असणाऱ्या गंगामाई  घाटावर दोन विद्यार्थी पोहण्यासाठी गेले असता त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी (दि.२४ मे) सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास घडली. यात आदित्य रामनाथ मोरे (वय १७, रा. घुलेवाडी, ता. संगमनेर) व श्रीपाद सुरेश काळे (वय १७, रा. -कोळवाडे, ता. संगमनेर) यांचा मृत्यू झाला आहे.

आदित्य व श्रीपाद हे दोघे शिक्षण घेत होते. ते महाविद्यालयीन मित्रांसोबत एकत्रितपणे दुपारच्यावेळी घुलेवाडी परिसरात बसले होते. मित्रांनी मिळून प्रवरा नदीवर पोहायला जाण्याचा निर्णय घेतला. – ते आपापल्या गाडीवर गंगामाई घाटावर आले आणि उकाड्यामुळे शरीर थंड करण्यासाठी नदीत उड्या घेतल्या. यावेळी त्यांना पाण्याचा फारसा ठाव लागला नाही. गंगामाई घाटावर नदीच्या कडेला पाणी कमी असून जसजसे आत जाऊ तसतसे पाणी पात्र खोल होत गेले आहे. बाळूतस्कारांच्या उपशामुळे पात्रात कोठे खड्डा तर कोठे संथ भाग असे नदीपात्र तयार झाले आहे. दरम्यान, सर्व मित्र कडेला पोहत होते, मात्र, आदित्य व श्रीपाद हे खड़द्धचाकडे गेले एका ठिकाणी खोल गर्त्यात सापडले. जेव्हा या दोघांच्या नाकातोंडात पाणी जायला सुरुवात झाली तेव्हा त्यांनी गटांगळ्या खाल्ल्या. बाचवा, वाचवा म्हणून आवाज देखील दिला. मात्र, ठाब न लागल्याने दोघांना पुरेसा श्वास घेता आला नाही,

त्यामुळे दोघांना मृत्यूला सामोरे जावे लागले. तत्पूर्वी अकोल्यातील घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हळहळला होता आता. पुन्हा संगमनेरातील दोन युवकांचा प्रवरा नदीपात्रात पाण्यात बुडून मृत्यू झाल्याने संपूर्ण तालुका हळहळ व्यक्त करत आहे. खरेतर, सुगाब बटुक येथील घटनेतील दोन तरुणांचा शोध घेण्यासाठी प्रवरा नदीत सोडलेले आवर्तन बंद केले होते, तरी देखील संगमनेरातील दोन युवक पाण्यात बुडून मृत्यू पावले.

Web Title: Two students drowned at Gangamai Ghat in Sangamner

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here