दोन सख्ख्या बहिणींचा रात्रीतून अचानक मृत्यू
Nagpur | नागपूर: जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील पाटणसावंगी येथील दोन बालिकांचा अचानक मृत्यू (Died) झाला. मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलिसांनी दोघींचे मृतदेह शवविच्छेदनासाठी नागपूर येथील मेयो रुग्णालयात पाठवण्यात आले. साक्षी मीना (६) व राधिका मीना (२) अशी मृत “बालिकांची नावे आहेत.
माहितीनुसार, पाटणसावंगी येथील कॉटन मार्केट परिसरात एका झोपडीवजा घरात गंगाबाई काळे राहतात. त्यांची मुलगी माधुरी हिचे राजस्थानातील मीना कुटुंबात लग्न झाले. तिला साक्षी व राधिका या दोन मुली आहेत. काही दिवसांपूर्वी गंगाबाई काळे यांच्या वडिलांचे निधन झाले. मात्र मुलगी राजस्थानात असल्याने ती अंत्यसंस्काराला येऊ शकली नव्हती. म्हणून काही दिवसांनी गंगाबाई काळे राजस्थानला जाऊन मुली व नातवांना घेऊन आल्या. दोन ते अडीच महिन्यांपासून ते पाटणसावंगीलाच राहत होते. सोमवारी ४ जुलैला रात्री उशिरा दोन्ही मुलींना शौचास लागली म्हणून आजी गंगाबाई व आई त्यांना बाहेर घेऊन गेल्या. आल्यानंतर दोघींच्याही गळ्यात खवखव सुरू झाली, म्हणून त्यांच्या गळ्याला बाम लावून शेकून दिले. मात्र मंगळवारी पहाटेच्या सुमारास दोघींचाही मृत्यू झाला.
Web Title: Two sisters died suddenly overnight