Home अहमदनगर अहिल्यानगर: मालवाहू पिकअप झाडावर आदळून दोन जण ठार

अहिल्यानगर: मालवाहू पिकअप झाडावर आदळून दोन जण ठार

Breaking News | Ahilyanagar Accident: मालवाहू पिकअप झाडावर आदळून झालेल्या अपघातात दोन जण ठार झाल्याची घटना घडली.

Two people were killed when a cargo pickup crashed into a tree

नेवासा:  नेवासा तालुक्यातील शिंगवे तुकाई फाटा येथे मालवाहू पिकअप झाडावर आदळून झालेल्या अपघातात दोन जण ठार झाल्याची घटना घडली आहे. पोलीस सूत्रांकडून समजलेल्या माहितीनुसार दि. 15 रोजी रात्री 8.30 वाजता शिंगवे तुकाई फाटा येथे मालवाहू गाडी (एमएचटी 7283) घोडेगाव मार्गे अहिल्यानगरकडे जात असताना शिंगवे तुकाई फाटा येथे एका झाडावर आदळली. त्यामध्ये असणारे राजकुमार साहेबराव शिरसाठ (वय 38) व संतोष कोंडीबा चन्ने (वय 40) दोघे रा. शिरसाठवाडी हे दोघेही जागेवर ठार झाले.

गोरक्ष कोंडीबा चन्ने (वय 52) रा. शिरसाठवाडी यांनी पिकअप चालक राजकुमार साहेबराव शिरसाठ याचे विरुद्ध रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून हयगयीने वाहन चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा र. नं. 11/2025 बीएनएसचे कलम 106, 341, 125(अ)(ब), 324(4)(5) मोटार वाहन कायदा कलम 184 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोसई सुरज मेढे करत आहेत.

Web Title: Two people were killed when a cargo pickup crashed into a tree

See also: Latest Marathi News,  Breaking News liveSangamner NewsAhmednagar News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here