Home अकोले अकोले: दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग

अकोले: दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग

Breaking News | Akole: एका गावात शाळा सुटल्यावर घरी जात असताना दोन अल्पवयीन मुलींना रस्त्यात थांबवून लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन करणाऱ्या सहा जणांच्या टोळीवर पोक्सो कायद्याअंतर्गत राजूर पोलिस ठाण्यात गुन्हा.

Two minor girls were molested

अकोलेः  आदिवासी भागातील एका गावात शाळा सुटल्यावर घरी जात असताना दोन अल्पवयीन मुलींना रस्त्यात थांबवून लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन करणाऱ्या सहा जणांच्या टोळीवर पोक्सो कायद्याअंतर्गत राजूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे.

याबाबत राजूर पोलिसांकडुन समजलेली माहिती अशी की, संबंधित दोघी अल्पवयीन बहीणी घरी जात असताना सहा जणांच्या टोळक्याने ‘आय लव यू जानू’ असे म्हणत त्यांच्यासोबत लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. पिडित अल्पवयीन मुलींनी राजुर पोलिस ठाण्यात वरील प्रमाणे फिर्याद दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी सुमित देवराम करवंदे, महेश गणपत भांगरे, जितू किरण ईद, प्रशांत धोंगडे, रोहिदास मुंडे, साई प्रतीक अर्जुन भांगरे या सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Two minor girls were molested

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here