Home अहमदनगर अहमदनगर: दोन अल्पवयीन मुली पळविल्या

अहमदनगर: दोन अल्पवयीन मुली पळविल्या

Breaking News | Ahmednagar: श्रीरामपूर शहर व तालुक्यातून दोन अल्पवयीन मुलींना पळवून नेण्याच्या घटना.

Two minor girls were abducted Ahmednagar

श्रीरामपूर : श्रीरामपूर शहर व तालुक्यातून दोन अल्पवयीन मुलींना पळवून नेण्याच्या घटना घडल्या आहेत. हरेगाव परिसरातून एक अल्पवयीन मुलीस पळवून नेले. घरातील सर्वजण रात्री जेवण करून झोपल्यानंतर सतरा वर्षांची मुलगी घराबाहेर पडली. रात्री १ वाजता मुलीच्या आईला जाग आली. त्यावेळी मुलगी घरात दिसली नाही. घराचा मागील दरवाजा उघडलेला होता. मुलीचा सर्वत्र शोध घेतला. मात्र ती सापडली नाही. यावरून तिला अज्ञात व्यक्तीने आमिष दाखवून पळवून नेल्याची फिर्याद वडिलांनी शहर पोलिस ठाण्यात दाखल केली.

दुसरी घटना तालुक्यातील वांगी परिसरात घडली. मुलगी बेपत्ताप्रकरणी गवंडी काम करणाऱ्या मुलीच्या वडिलांनी पोलिसांकडे फिर्याद दिली. मुलीला दुचाकीवर महाविद्यालयात सोडले. मात्र सायंकाळी मुलगी घरी न आल्याने तिच्या मैत्रिणीकडे चौकशी केली. मात्र ती मिळून आली नाही.

Web Title: Two minor girls were abducted

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here