Home संगमनेर संगमनेर: जोर्वे नाका दंगल घटनेतील मुख्य दोन आरोपींना अटक

संगमनेर: जोर्वे नाका दंगल घटनेतील मुख्य दोन आरोपींना अटक

Sangamner News: वाहनचालकाने केवळ हॉर्न वाजवला म्हणून मोठ्या जमावासह त्याच्यावर हल्ला चढवण्याच्या प्रकरणातील मुख्य आरोपी अखेर दोन महिन्यांनी अटक (Arrested) केली आहे.

Two main accused in Jorve Naka riot incident arrested

संगमनेर: संगमनेर खोळंबलेल्या वाहनचालकाने केवळ हॉर्न वाजवला म्हणून मोठ्या जमावासह त्याच्यावर हल्ला चढवण्याच्या प्रकरणातील मुख्य आरोपी अखेर दोन महिन्यांनी अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. रविवारी शहर पोलिसांनी संशयावरुन पाच जणांना ताब्यात घेतले होते. रात्री उशिरापर्यंत त्यांची सखोल चौकशी केल्यानंतर त्यातील दोघांना गजाआड करण्यात आले असून उर्वरीत तिघांना सोडून देण्यात आले आहे. अटक केलेल्या दोघांना आज न्यायालयासमोर हजर केले असून अटक केलेल्या दोघांनाही २७ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत पाठवण्यात आले आहे.

इरफान आयुब पठाण उर्फ इम्रान वडेवाला (वय ३३, रा. डाकेमळा ) व वसीम इसहाक पठाण (वय ३०, रा. नाईकवाडपुरा ) या दोघांना अटक केली आहे.

याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार रविवारी (ता. २३) शहर पोलिसांच्या विशेष पथकाकडून दोन महिन्यांपूर्वी २८ मे रोजी जोर्वे नाक्यावर  घडलेल्या दंगलीतील आरोपींचा शोध सुरु असताना त्यातील काही पसार आरोपी घरी पतरल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानुसार पथकाने विविध भागात छापे घालून संशयित म्हणून पाच जणांना ताब्यात घेत सायंकाळी शहर पोलीस ठाण्यात आणले. यावेळी ताब्यात घेतलेले सर्व संशयित व त्यांचे कुटुंबीय सदरील प्रकरणात आपला सहभाग नसल्याचे ओरडून सांगत होते. मात्र जोपर्यंत खात्री होत नाही, तोपर्यंत कोणालाही सोडणार नाही अशी कठोर भूमिका घेत पोलिसांनी त्यांची सखोल चौकशी सुरु केली. त्यातून दोघांचा या घटनेशी थेट संबंध असल्याचे आणि त्यातील एक घटनेचा मास्टरमाईंड असल्याचे समोर आले. रविवारी मध्यरात्री ताब्यात घेतलेल्या सर्व संशयितांची वास्तव माहिती समोर आल्यानंतर पोलिसांनी ताब्यात घेतलेले इतर तिघे सोडून दिले व त्यातील या संपूर्ण घटनेचा मुख्य सूत्रधारसह दोघांना अटक करण्यात आली आहे.

Web Title: Two main accused in Jorve Naka riot incident arrested

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here